पंतप्रधान यावर्षी अयोध्येत साजरी करणार दिवाळी

साडेसात लाख मातीचे दिवे उजळविणार

अयोध्या : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याआधी दिवाळीचा सण देशाचे संरक्षण करणा-या सैनिकांसोबत साजरा केला होता. यावर्षी पंतप्रधान प्रभू श्री रामाची नगरी अयोध्या येथे दिवाळी साजरी करणार आहेत. येत्या ४ नोव्हेंबरला संपूर्ण जगात साज-या होणा-या दिवाळीच्या दिवशी शरयू नदिच्या काठावर मातीचे साडेसात लाख दिवे उचळून दिवाळी सजरी करण्यात येणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या दहा दिवस चालणा-या दिवाळी उत्सवाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. शरयू नदिच्या काठावर ‘राम कि पौडी’ या घाटावर साडेसात लाख मातीचे दिवे उजळून गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात येणार आहे. उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वात भाजपाची सत्ता आल्यापासून अयोध्या नगरीमध्ये दरवर्षी दिवाळीला दीपोत्सव साजरा करण्यात येतो. दीपोत्सवाचे हे पाचवे वर्ष आहे. येत्या दिवाळीतील दीपोत्सव साजरा करण्यासाठी राम मनोहर लोहिया अवध विद्यापिठाच्या सुमारे सात हजार विद्यार्थ्यांना प्रशिक्षीत करण्यात येत आहे. ते या कार्यक्रमात स्वयंसेवक म्हणून काम करतील. यापूर्वी २०१९ मधे सुमारे ४ लाख १० हजार दिवे उजळण्यात आले होते. तर २०२० मधे ६ लाख ६ हजार ५६९ दिवे उजळून दीपोत्सव साजरा करण्यात आला होता.

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.