तालिबानला पाकिस्तानने पोसले

वॉशिंग्टन
पाकिस्ताननेच तालिबानला पोसले असल्याचा स्पष्ट आरोप भारताने केला. अफगाणिस्तानातील स्थितीवर भारत आणि अमेरिकेचे बारकाईने लक्ष आहे, असेही परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला यांनी म्हटले. श्रृंगला सध्या अमेरिकेच्या दौर्‍यावर असून, ते पत्रकारांशी बोलत होते. अफगाणिस्तानातील परिस्थिती सध्या खूपच अस्थिर आणि संदिग्ध आहे. भारत इतक्यात तरी तेथे कोणत्याही स्वरूपाचा सहभाग घेण्याची शक्यता नसल्याचेही हर्षवर्धन श्रृंगला यांनी म्हटले.
अफगाणिस्तानातील सद्यस्थिती, पाकिस्तान आणि त्याचबरोबर क्वाड संघटना याविषयी श्रृंगला यांनी अमेरिकी अधिकार्‍यांशी चर्चा केली. अफगाणिस्तानातील स्थितीबाबत कोण कशी भूमिका बजावत आहे, यावर त्यांचे (अमेरिका) बारकाईने लक्ष असेल. पाकिस्तान अफगाणिस्तानचा शेजारी आहे, त्यांनीच तालिबानला पोसले आहे. अशाच अनेक घटकांना पाकिस्तानने बळ दिले आहे. संयुक्त राष्ट्रांनी निबर्ंध घातलेल्यांमध्ये जैश-ए-महंमद आणि लष्कर-ए-तैयबा यांचाही समावेश आहे. या दोन गटांनी पूवीर्ही अफगाणिस्तानात भूमिका बजावली आहे, आताही त्यांच्यावर लक्ष असेलच. पाकिस्तानकडे आम्ही त्या संदर्भात पाहतो, असे श्रृंगला म्हणाले. श्रृंगला यांनी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकेन यांचीही भेट घेतली.
भारताने तालिबानबाबत थांबा आणि पाहाअसे धोरण स्वीकारले आहे, याचा त्यांनी पुनरुच्चार केला. भारत आणि अमेरिका यांच्यातील टू प्लस टूस्तरीय चर्चा नोव्हेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे. अमेरिकेचे पर्यावरणविषयक विशेष दूत जॉन केरी भारत दौर्‍यावर येण्याची शक्यता आहे, अशीही माहिती श्रृंगला यांनी दिली. भारताने संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या एका महिन्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावल्याची प्रतिक्रिया परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला यांनी दिली. अफगाणिस्तानबाबत ठराव संमत करण्यामध्ये भारताची भूमिका सकारात्मक असल्याचे ते म्हणाले. हा ठराव म्हणजे सर्वसमावेशक असा राजकीय संमतीने करण्यात आला होता. भारताच्या अध्यक्षपदाच्या काळात तो होत असल्याने भारतासाठी तो खूप महत्त्वाचा होता, असे ते म्हणाले.
भारताचे कतारमधील राजदूत दीपक मित्तल यांनी नुकतीच तालिबानचा प्रतिनिधी शेरमहंमद स्तानेकझाई याच्याशी दोह्यामध्ये चर्चा केली. ह्यया भेटीत अफगाण भूमीवरून भारतविरोधी दहशतवादी कारवाया होऊ देऊ नयेत. त्याचबरोबर, अफगाणिस्तानात अद्याप अडकलेले भारतीय नागरिक आणि ज्यांना भारतात अडकलेले अफगाण नागरिक यांच्या प्रवासात अडथळे येऊ नयेत, यावर भर दिला, असे परराष्ट्र सचिव श्रृंगला यांनी स्पष्ट केले.
जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुगा या महिनाअखेरीस पद सोडणार आहेत. यामुळे क्वाड देशांच्या बैठकीवर परिणाम होईल का, असे विचारता श्रृंगला म्हणाले, ह्यही परिषद झाल्यास त्याला उपस्थित राहू, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे. इतर नेत्यांचीही अशीच भूमिका असावी. ही बैठक २३ आणि २४ सप्टेंबरला वॉशिंग्टनमध्ये होण्याची शक्यता आहे. या वेळी पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांची भेट होण्याचीही शक्यता आहे.
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.