जिवंत विद्युत तारेच्या स्पर्शाने पाच जनावरे दगावली

गोंदिया जिल्ह्याच्या आमगाव तालुक्यातील नवेगाव येथे जनावरे चरत असताना विद्युत वाहिनी खांबातील जिवंत विद्युत तार वाहिनी अचानकपणे तुटल्याने जनावरांच्या अंगावर पडली यात पाच जनावरे जागीच ठार झाली आहेत.

पाच जनावरे जिवंत विद्युत तारेच्या स्पर्शाने दगावल्याने शेतकऱ्यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. मात्र मनुष्य हानी मात्र टळली यात चार म्हशी आणि एक गाय यांचा समावेश आहे. या प्रकरणी शेतकऱ्यांनी महावितरण विरोधात आमगाव पोलिसात तक्रार दिली आहे.

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.