कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी हवे लसीचे तीन डोस

वॉशिंग्टन
गेल्या दीड वर्षांपासून कोरोना व्हायरसने संपूर्ण जगात धुमाकूळ घातला आहे. जगभरात कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल २१ कोटींचा टप्पा पार केला आहे. तर लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनामुळे अनेक देशांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रगत देशही हतबल झाले आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शथीर्चे प्रयत्न केले जात आहेत. जगभरात कोरोना लसीकरण वेगाने सुरू असून आतापयर्ंत कोट्यवधी लोकांनी लस घेतली आहे. चीनमधून संसर्गास सुरुवात झालेल्या या व्हायरसबाबत अजूनही वेगवेगळी मतमतांतरे मांडली जात आहेत. यादरम्यान अमेरिकेतील ज्येष्ठ संसर्गजन्य रोगतज्ज्ञ डॉक्टर अँथनी फौसी यांनी एक दावा केला आहे.
कोरोना लसीचे सामान्यत: दोन डोस जगभरात दिले जात आहेत. अमेरिकेसह काही देशांमध्ये, हाय रिस्क असलेल्या लोकांना लसीचे तीन डोस देखील दिले जात आहेत. पण आता डॉक्टर अँथनी फौसी यांनी लोकांना येत्या काळात कोरोना लसीच्या तीन डोसची आवश्यकता असू शकते असे म्हटले आहे. त्यांच्या मते, दोन डोस घेतल्यानंतर काही महिन्यांनी, कोरोनाशी लढण्यासाठी अँटीबॉडी कमी होत आहेत. त्यांनी या संबंधित काही डेटा देखील दाखवला आहे. फौसी यांनी इस्रायलचा डेटा शेअर केला. इस्रायलमध्ये मोठ्या संख्येने लोकांना लसीचा बूस्टर डोस देण्यात आला आहे. आकडेवारीनुसार, दहा लाख लोकांना ज्यांना लसीचे तीन डोस देण्यात आले आहेत. त्यांच्यावर त्यांचा खूप चांगला परिणाम झाला आहे. या सर्वांना फायझरची लस देण्यात आली.
कोरोना लस दिल्यानंतर १२ दिवसांनी त्याच्यावर रिसर्च करण्यात आला. यानुसार ज्यांना लसीचा तिसरा डोस देण्यात आला, त्यांना कोरोना होण्याचा धोका फक्त दहा टक्के राहिला आहे. तसेच अमेरिकेत २0 सप्टेंबरपासून बूस्टर डोस दिले जातील. लसीचा तिसरा डोस दुसर्‍या डोसनंतर आठ महिन्यांनी दिला जाईल. अमेरिकेतील बहुतेक लोकांना फायझर आणि मॉडनार्ची लस देण्यात आली आहे. या दोन्ही लसींचे पहिले दोन डोस २८ दिवसांच्या अंतराने दिले जातात. यापूर्वी अमेरिकेत फक्त हाय रिस्क असलेल्या रुग्णांना बूस्टर डोस देण्याची परवानगी देण्यात आली होती. एका इंग्रजी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. युरोपमध्ये कोरोनाचा प्रकोप पाहायला मिळणार आहे. डिसेंबरपयर्ंत २ लाखांहून अधिक लोकांच्या मृत्यूची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हड ने ही भीती व्यक्त केली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (हड) युरोपियन देशांमध्ये कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने या वर्षी १ डिसेंबरपयर्ंत युरोपमध्ये सुमारे २ लाख ३६ हजार लोकांचा कोरोनामुळे मृत्यू होऊ शकतो अशी भीतीही व्यक्त केली आहे. यावेळी कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटने कहर केला असून रुग्णांची संख्या आणि मृतांचा आकडा वाढताना दिसत आहे. युरोपमध्ये कोरोनामुळे आतापयर्ंत १.३ मिलियन लोकांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.