पुलगावाजवळ भीषण अपघातात तीन ठार Three killed in road mishap near Pulgaon

वर्धा :  मंगळवारी  पहाटे पुलगाव नजीकच्या मलकापूर शिवारात नेक्सा कंपनीची बोलेनो कार क्रमांक mh-40  BE8394 गाडीने उभ्या ट्रकवर धडक दिली. हा अपघात एवढा भीषण होता गाडी  चकनाचूर झाली. या अपघातात दिलीप वामनराव इंगोले, सुरेखा दिलीप इंगोले, दीपक चैतराम मुंजेवार हे ठार झाले. अपघातग्रस्त गाडी ही शेगाववरुन नागपूरला जात होती व मुलगी गाडी चालवित होती. अपघातात तिच्या आई वडिलांचा दुर्देवी मृत्यू झाला हे सर्व नागपुरमधील हिंगणा परिसरातील रहिवाशी होते. पुलगाव येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.