कारंजा तालुक्यात तीन अपघातात तिघांचा मृत्यू

Share This News

 
तालुक्यातील बोरगाव ढोले, एकांबा व ठाणेगाव येथील युवकांचा दुचकी अपघातात मृत्यू झाला. या तिन्ही घटना एका तासात घडल्या. तिन्ही युवक एकाच तालुक्यातील अल्याने तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
पहिला अपघात टोल नाक्याजवळ झाला यात अज्ञात वाहनाने दुचाकीला अपघात झाला तर दुसर्‍या घटनेत दोन दुचाकी समोरासमोर एकमेकांना धडकल्या यात तिघांचा मृत्यू झाला बोरगाव येथील भूषण ज्ञानेश्‍वर ढोले वय २४ हा आपल्या दुचाकी क्र एमएच ३२ एएन ३७८३ ने गावाला जात असतांना टोलनाक्याजवळ अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिली यात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला घटनास्थळावरून अज्ञात वाहन पसार झाले होते.
दुसरी घटना पारडी येथून एकांबा येथे दुचाकीने रोशन बबन डोंगरे वय ३0 परत येत असतांना वाटेतच जंगली डुकराने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीचालक गंभीर जखमी झाला त्याला नागपूर येथे उपचारासाठी पाठविण्यात आले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. रोशन हा विवाहित असून त्याला पत्नी व दोन मुले आहेत.
तिसर्‍या घटनेत ठाणेगाव येथील कुंतेश्‍वर मुóो वय २८ हा नागपूरला राहायचा. कोरोनामुळे गावी परत आला त्याच्या घरमालकाने घरभाडे मागणी केल्याने तो घरभाडे देण्यासाठी दुचाकीने नागपूरला गेला होता. गावाला परत येत असतांना राष्ट्रीय महामार्गावरील सातनवरी गावाजवळ विरूध्द दिशेने दुचाकी घेवून येत असलेल्या दुचाकी एकमेकांवर धडक दिली.
अपघात इतका भयानक होता की यात कुंतेश्‍वर याच्या दुचाकीच्या समोरील भाग चेंदामेंदा झाला कुंतेश्‍वर मुóो याचा जागीच मृत्यू झाला. कुंतेश्‍वर विवाहित असून त्याची पत्नी पाच महिन्याची गर्भवती आहे. बाळ येण्यापूर्वीच पतीचा मृत्यू झाल्याने पत्नीला धक्का बसला आहे.तर समोरील दुचाकी चालक गंभीर जखमी आहे.
तालुक्यातील तीन युवकाचा काल रात्रीच्या सुमारास अवघ्या एका तासाच्या आत वेगवेगळया ठिकाणी अपघात घडला तिघांचा दुर्देवी मृत्यू झाल्याने तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.
तिन्ही घटनेची वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला नोंद घेण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस करीत आहे.
     

     << Back to Headlines     

     << Back to Headlines     


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.