कुटुंबातील तिघांची गळफास घेऊन आत्महत्या

नगरः अहमदनगर जिल्ह्यात केडगाव येथील एकाच कुटुंबातील तिघांनी गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली असून आर्थिक विवंचेनेतून हा प्रकार घडल्याचे प्राथमिक चौकशीतून पुढे आले आहे.
मुलीला गळफास देऊन नंतर दाम्पत्याने गळफास लावून आत्महत्या केल्याचा अंदाज आहे. आत्महत्या करणाऱ्या कुटुंबातील सदस्यांची नावे संदीप दिनकर फाटक (वय ४५), किरण संदीप फाटक (वय ३२) व मैथिली संदीप फाटक (वय १०) अशी आहेत. सकाळी शेजाऱ्यांच्या लक्षात हा प्रकार आल्यावर त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रात्री फाटक कुटुंबाचे नातेवाईकांशी दूरध्वनीवरून बोलणे झाले होते. सकाळी त्यांनी पुन्हा संपर्क साधला. बराच काळ प्रतिसाद न मिळाल्याने शेजारी तसेच सासुरवाडीतील लोकांनी घरी जाऊन पाहिले असता तिघेही गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. नातेवाईकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फाटक गेल्या काही काळापासून आर्थिक विवंचनेत होते. कोरोना काळात त्यांची परिस्थिती अत्यंत हलाखीची झाली होती. त्यातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ माजली आहे.

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.