भंडारा शहरालगत आढळले वाघाच्या पायाचे ठसे

भंडारा,- आजपर्यंत लहान मोठे प्राणी शहरात येत असल्याचे ऐकीवात होते. मात्र आज 13 रोजी शहरालगत असलेल्या गणेशपूर येथे एका पट्टेदार वाघाचे पायाचे ठसे आढळून आल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. विशेष म्हणजे वनविभागानेही वाघ येऊन गेल्याचा शक्यतेवर शिक्कामोर्तब केल्याने परिसरातील गावांमध्ये नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.वैनगंगा नदीकाठावर वसलेल्या व भंडाराचा शहराचा अविभाज्य भाग म्हणून ओळखल्या जात असलेल्या गणेशपूर स्मशाभूमित आणि पाणी पुरवठासाठी ग्रामपंचायतीच्या टाकी परिसरात आज 13 रोजी दुपारी काही लोकांना वाघाच्या पायाचे ठसे आढळून आले. गणेशपूर येथील यशवंत सोनकुसरे यांनी ही माहिती उपवनसरंक्षकांना दिली.

या माहितीच्या आधारे त्यांनी वनविभागाचे एक पथक पाठवून प्रत्यक्ष पाहणी केली असता वाघ येऊन गेल्याच्या चर्चेत तथ्य असल्याचे पुढे आले आहे. दिसत असलेेले हे ठसे वाघाच्या पायाचे असल्याचे वनविभागाने स्पष्ट केले आहे. गणेशपूर येथील नवीन स्मशानभूमी परिसरात आणि पिंडकेपार येथे असलेल्या गणेशपूर ग्रामपंचायतीच्या पाणी पुरवठा करणाèया टाकीजवळ ओल्या जमिनीवर हे ठसे आढळून आले आहे. यामुळे गणेशपूर, पिंडकेपार, कोरंभी आणि परिसरातील गावामध्ये दिवसभर शोधकार्य राबविण्यात आले. सोबतच नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. वनधिकाऱ्यासह गणेशपूरचे सरपंच स्वतः मनिष गणवीर हे पूर्णवेळ पथकासह होते.
 गस्त वाढविला – भलावी

ठसे हे वाघाचे असून काही दिवसापुर्वी नागझिरा अभयारण्यातून आलेला व माटोरा जंगलात कॅमेèयात ट्रॅप झालेलाच हा वाघ असावा अशी शक्यता भंडाèयाचे उपवनसरंक्षक भलावी यांनी स्पष्ट केले आहे. वनधिकाèयाचे अधिकारी आणि कर्मचारी शोधकार्यात लागले असून ज्या भागात ठसे आढळले तेथे गस्त वाढविला असल्याचे सांगताना नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन त्यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.