बीजिंगमध्ये मुसळधार, पाण्यात तरंगताहेत कार

बीजिंग
चीनची राजधानी असलेल्या बीजिंगमध्ये मुसळधार पावसाने अनेक वर्षांचा विक्रम मोडला आहे. सतत पडणारा हा पाऊस आता लोकांसाठी आपत्ती ठरत असून या पावसामुळे चीनची राजधानी असलेल्या बीजिंगमधील रस्त्यांवर मोठय़ा प्रमाणात पाणी साचून राहिलेय. पावसाने रौद्र रुप धारण केल्याने मदत कार्यासाठी बोटींना रस्त्यावर उतरावे लागले आहे.
चीनमध्ये सततच्या पावसामुळे बीजिंगमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली असून लोक मोठय़ा वाहनांना धक्का देऊन पाण्याबाहेर काढत आहेत.चीनमध्ये सततच्या पावसामुळे बीजिंगमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली असून लोक मोठय़ा वाहनांना धक्का देऊन पाण्या बाहेर काढत आहेत. हा मुसळधार पाऊस पाहता हवामान विभागाने बीजिंगमध्ये यलो अलर्ट जारी केला आहे. बीजिंगमध्ये यावर्षीच्या पावसाने ६२ वर्षांचा विक्रमही मोडीत काढला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पावसामध्ये ३0 टक्क्यांनी वाढ झालीय. बीजिंगमध्ये आत्तापयर्ंत ६२७.४ मिलीमीटर पाऊस झाला असून गेल्या २0 वर्षांतील हा सर्वाधिक पाऊस आहे.

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.