३० जानेवारी हुतात्मा दिन म.न.पा.तर्फे श्रध्दांजली

देशाच्या स्वातंत्रयासाठी प्राणर्पण केलेल्या हुतात्माच्या स्मरणार्थ शनिवार (३० जानेवारी) रोजी सकाळी ११.०० वाजता दोन मिनिटे मौन (स्तब्धता) पाळून नागपूर महानगरपालिकेतील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीतील दालनात झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात हुतात्मा दिन पाळण्यात आला.

याप्रसंगी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त महापौर श्री. दयाशंकर तिवारी, उपमहापौर श्रीमती मनीषा धावडे यांनी गांधींजींच्या छायाचित्राला माल्यार्पण करुन विनम्र अभिवादन केले.

यावेळी अतिरिक्त आयुक्त श्री. राम जोशी, श्री. संजय निपाणे, उपायुक्त श्री. निर्भय जैन, श्री. रविन्द्र भेलावे, सहा.आयुक्त श्री. महेश धामेचा, उद्यान अधीक्षक श्री. अमोल चौरपगार, मुख्य अग्निशमन अधिकारी श्री. राजेन्द्र उचके, अतिरिक्त सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. ‍विजय जोशी, अधीक्षक (सा.प्र.वि.) मदन सुभेदार आदी उपस्थित होते.

बॅरि. शेषराव वानखेडे पुण्यतिथी निमित्त म.न.पा. तर्फे विनम्र अभिवादन
नागपूर नगरीचे प्रथम महापौर व माजी मंत्री बॅरि. शेषराव वानखेडे यांच्या पुण्यतिथी प्रित्यर्थ नागपूर महानगरपालिकेच्या मुख्यालयातील उदयान स्थित प्रतिमेला महापौर श्री.दयाशंकर तिवारी, उपमहापौर श्रीमती मनीषा धावडे यांनी पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले.

याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्री. राम जोशी, श्री. संजय निपाणे, उपायुक्त श्री. निर्भय जैन, श्री. रविन्द्र भेलावे, सहा.आयुक्त श्री. महेश धामेचा, उद्यान अधीक्षक श्री. अमोल चौरपगार, मुख्य अग्निशमन अधिकारी श्री. राजेन्द्र उचके, अतिरिक्त सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. ‍विजय जोशी, अधीक्षक (सा.प्र.वि.) मदन सुभेदार आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.