दोन घरफोड्यात दोन लाखांचा मुद्देमाल चोरी

नागपूर : तहसील हद्दीत मोहम्मद जमशेद वल्द हाजी मोहम्मद इस्लाम (४७) रा. मासुमशहा तकीया, यांचा मुलगा मुलगा मोहम्मद अशफी ( २५) रा. तकीया दिवानशहा, याची पत्नी गरोदर होती. २६ जानेवारीला पहाटे ३ वाजताच्या सुमारास तिला प्रसूतीकरिता हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला. या दरम्यान चोरट्याने बेडरूममधील आलमारीचे कुलूप तोडून सोन्याचे दागिने, घड्याळ व नगदी ५0 हजार रुपये, असा एकूण ९८ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला. हुडकेश्‍वर हद्दीतील सुदामनगरी, येथे राहणारे अनिल प्रभाकरराव पलांदुरकर (५२) हे २६ जानेवारीला ११.३0 वाजताच्या सुमारास घराच्या दाराला कुलूप लावून कुटुंबासह बाहेर गेले होते. चोरट्याने कपाटातील ९८ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.