विचित्र अपघातात दोन अल्पवयीन ठार, अमरावती-परतवाडा महामार्गावरील घटना

शेतात फवारणीसाठी पेट्रोल घेऊन जाणाऱ्या युवकाच्या मोपेडला बोलेरो वाहनाने फरफटत नेल्याने घर्षणातून निघालेल्या ठिणगीमुळे दुचाकीने पेट घेतला. या अपघातात दोघे अल्पवयीन दुचाकीस्वार होरपळून जागीच मृत्युमुखी पडले. अमरावती-परतवाडा महामार्गावरील टाकरखेडा पूर्णा येथे सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास हा अपघात घडला.

निवृत्ती दीपकराज सोलव (14 वर्षे, राहणार तळणी पूर्णा यांचा जागीच होरपळून मृत्यू झाला असून सार्थक अनंतराव वैद्य (16, राहणार तळणी पूर्णा) हा गंभीररीत्या जखमी झाला आहे. हे दोघेही आपले तळणी गाव येथून दुचाकी वाहनाने आसेगावकडे येत असताना अमरावती वरून निंभारीकडे जाणाऱ्या महिंद्रा कंपनीच्या मालवाहू पिकअप बोलोरा भरधाव वाहनाने जबर धडक दिल्याने दोन्ही वाहनांनी पेट घेतला.

निवृत्ती दीपक सोलोव यांच्यासह राज अनंतराव वैद्य (17) या तरुणाचाही अपघातात मृत्यू झाला आहे. महिंद्रा पिकअप बोलेरो हे वाहन निंभारी येथील सगने यांचे असून ते वाहन अमरावतीवरून निंभारीकडे वाहनचालक योगेश सुभाष सगने घेऊन जात होते. अपघात होताच वाहन चालक घटनास्थळावरून पसार झाला आहे.

परिसरातील नागरिकांनी पेट घेतलेल्या वाहनांना विझविण्याचा प्रयत्न केला. पुढील तपास आसेगाव पोलिस स्टेशनचे ठाणेदार किशोर तावडे यांच्या नेतृत्त्वात मोहन टोम्पे, नंदकिशोर बाकल, सागर डोंगरे करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.