आमदार मुनगंटीवार यांच्या प्रयत्नातून बल्लारपुरात आणखी दोन रुग्णवाहिका

Share This News

चंद्रपूरः चंद्रपूर जिल्ह्यात बल्लारशा मतदारसंघात माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात भाजपच्या वतीने कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा वाढविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून बल्लारशामध्ये आणखी दोन रुग्णवाहिका मुनगंटीवार यांच्या प्रयत्नातून रुग्णांच्या सेवेत उपलब्ध होत आहेत.
चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाच्या प्रकोपात रुग्णांना दिलासा देण्यासाठी भाजप पुढे आला आहे. आमदार मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने भाजपने चंद्रपूर जिल्ह्यासह बल्लारशा परिसरात व्यापक प्रमाणात सोयी उपलब्ध करून दिल्या आहेत. सर्व सोयींनीयुक्त अशी रुग्णालये, ऑक्सीजन कॉन्सेन्ट्रेटर, मास्क व इतर उपकरणांसह भाड्याने घेतलेल्या आठ रुग्णवाहिकांची सुविधा परिसरात उपलब्ध करण्यात आली आहे. त्यात आणखी दोन रुग्णवाहिकांची भर घालण्यात आली असून कन्यका माता ट्रस्ट आणि जेम्स अन्ड ज्वेलरी रिलीफ फाऊंडेशनच्या वतीने या रुग्णवाहिका उपलब्ध झाल्या आहेत. “कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी ज्या काही सुविधा देता येतील, त्या पुरविण्याचे भाजपच्या पदाधिकाऱ्यांचे प्रयत्न आहेत” असे प्रतिपादन आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठीही नगर पालिकेच्या प्रयत्नातून सुसज्ज रुग्णालयांची उभारणी यापूर्वीच करण्यात आली आहे


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.