गोंदियात घराबाहेर असलेल्या चारचाकी वाहनांना अज्ञातांनी लावली आग

गोंदिया,दि.11ः राज्यातील इतर मोठ्या महानगरामध्ये रात्रीच्या सुमारास वाहनांना आग लावून जाळण्याच्या घटना एैकावयासय नव्हे तर बघावयास मिळाल्या असताना आज गुरुवारच्या मध्यरात्रीला अज्ञातांनी गोंदियातील श्रीनगर भागात वाहनांनी आग लावल्याची घटना उघडकीस आली आहे. येथील श्रीनगर परिसरात काही अज्ञातांनी दोन ते तीन चारचाकी गाड्या पेटवल्या आहेत. यामुळे वाहनमालकांचं लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे. सध्या पोलीस या प्रकरणातील अज्ञात आरोपींचा शोध घेत आहेत.श्रीनगर परिसरात असलेल्या नागरी वस्तीत काही अज्ञात समाजकंटकांनी घराबाहेर पार्क केलेली चारचाकी वाहनं जाळल्या.गुरुवारच्या मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.