भारतात 24 तासात 37,875 नवे कोरोना रुग्ण

नवी दिल्ली, 8 सप्टेंबर प्रदीर्घ जागतिक कोरोना संकटात गेल्या 24 तासात भारतात 37,875 नवे कोरोना रुग्ण आढळले असून 369 नागरिकांचा मृत्य झाला आहे. 39,114 नागरिक बरे झाले आहेत.

भारतात कोरोनाचे 3,30,96,718 रुग्ण झाले असून एकूण 3,22,64,051 नागरिक बरे झाले आहेत. एकूण सक्रीय रुग्ण संख्या 3,91,256 झाली आहे. देशात मृतांचा आकडा 4,41,411 आहे.आतापर्यंत देशात 70,75,43,018 नागरिकांचे लसीकरण झाले. केंद्रीय आरोग्य आणि परिवार कल्याण मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने एका दिवसात एकूण 17,53,745 नमुन्यांची तपासणी केली. आतापर्यंत देशात एकूण 53,49,43,093 चाचण्या घेण्यात आल्या.

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.