नागपूर : अपघातमुक्त मार्गांसाठी नितीन गडकरींनी घेतली बैठक

नागपूर, 4 सप्टेंबर : जागतिक कोरोना संकटाच्या सावलीत रस्त्यांवरील अपघातांचे प्रमाण कमी व्हावे यासाठी केंद्रीय मंत्री आणि नागपूरचे खासदार नितीन गडकरींनी राज्यसभा खासदार डॉ विकास महात्मे , महापौर, जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त, पोलिस आयुक्त, प्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ ), सामाजिक संस्था आणि लोकप्रतिनिधींसहआढावा बैठक घेतली.

रस्त्यांवरील धोकादायक जागा शोधून लगेच दुरुस्त करून रस्ता अपघातमुक्त करण्याचे निर्देश या वेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी उपस्थित मान्यवर आणि अधिकाऱ्यांना दिले. ट्वीटर द्वारे नितीन गडकरींच्या कार्यालयाने ही माहिती दिली.

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.