University exams will be conducted online only विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाईन पध्दतीनेच होणार

नागपूर
कोरोना प्रादुर्भावामुळे शिक्षण पध्दतीतही काहीसा बदल आला आहे. शिक्षणासोबतच परीक्षाही ऑनलाईनपध्दतीने होत आहेत. यापूर्वी विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षाही ऑनलाइन पद्धतीनेच घेण्यात आल्या होत्या. आता पालकांनीही पुढील वर्षाच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्याची मागणी केली होती. त्यातूनच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षा ऑनलाइनपद्धतीने घेण्यात येणार असल्याचा निर्णय कुलगुरूंनी घेतला असल्याची माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी (ता.५) पत्रकार परिषदेत दिली.
सावंत यांनी सांगितले की, राज्यात उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या वतीने तयार करण्यात येणार्‍या मुला-मुलींच्या वसतिगृहांना यापुढे ‘मातोश्री’ वसतिगृह असे नाव देण्यात येणार आहे. संस्कृत भाषेच्या संवर्धन आणि विकासासाठी कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे चार उपकेंद्र राज्यात लवकरच स्थापन करण्यात अशी माहिती दिली. या उपकेंद्राच्या माध्यमातून राज्याच्या कानाकोपर्‍यात संस्कृत भाषेच्या शिक्षणाचा प्रचार व प्रसार करण्यात येईल. कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ रचनात्मक कामांचे केंद्र बनावे. यासाठी शासन विद्यापीठाला पूर्ण सहकार्य करेल. या विद्यापीठाच्या धर्तीवर राज्यातील कानाकोपर्‍यामध्ये संस्कृत भाषा जनसामान्यापर्यंत पोहवावी यासाठी हे चार उपकेंद्र लवकरच स्थापन करण्यात येणार आहे. यामध्ये रत्नागिरी , पुणे, नाशिक आणि औरंगाबाद या विभागाचा समावेश असल्याची माहितीही सावंत यांनी पत्रकार परिषदेतून दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.