राज्यात पुढील चार दिवस अवकाळी पावसाचा अंदाज; गारपिटीचीही शक्यता

मुंबई, ९ एप्रिल : राज्यात पुढील चार दिवस अवकाळी पाऊस आणि गारपीट पडेल अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. पुढील चार दिवस राज्याच्या सर्वच भागांत कमी-अधिक प्रमाणात पाऊस कोसळण्याची शक्यता आहे, असेही त्यांनी सांगितले. 
मुंबई, ठाणे, पालघरसह कोकणपट्टीच्या काही भागांत गुरुवारी सकाळी पावसाचा हलक्या सरी पडल्या. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या काही भागांत मेघगर्जनेसह वादळी पाऊस पडेल अशी शक्यता आहे. कोकणाबरोबरच मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात ही वादळी पावसाची शक्यता वर्तवली आहे. 

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.