अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या,थंडी वाढली

नागपूर : गुरुवारी रात्री शहरात अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. त्यामुळे शहरातील अनेक भागातील वीजपुरवठा खंडित झाला होता. या पावसामुळे शेतकर्‍यांची चिंता वाढली आहे. तर हवेमध्ये रात्री पुन्हा गारवा वाढला. पूर्व विदर्भातील जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. गुरुवारी सकाळी बहुतेक भागात वातावरण ढगाळलेले होते. मात्र, रात्री ९.३0 वाजताच्या सुमारास मात्र नागपुरात पावसाने हजेरी लावली. काही मिनिटे आलेल्या या पावसामुळे वातावरणात चांगलाच गारवा पसरला. हा पाऊस मात्र, शेतकर्‍यांची चिंता वाढविणारा ठरला आहे.
हरभरा, गहू या पिकांसाठी नुकसानकारकअसलेल्या या पावसामुळे आंबिया बहाराचेही अधिक नुकसान होते. आता कुठे आंब्याला बहर आला आहे. मात्र पहिल्याच बहरात पाऊस आल्याने तो गळण्याची शक्यता असल्याचे आंब्याच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता अधिक आहे. या सोबतच वांगी, फुलकोबी, पत्ताकोबी या प्रकारच्या भाजीपाल्यावर किडींचा प्रकोप वाढण्याची शक्यताही या वातावरणामुळे वाढली आहे. गेल्या काही दिवसांपासून थोडीफार थंडी जाणवू लागली होती. शहरात १६ ते १७ अंशांपयर्ंत पोहोचलेला पारा अचानक ११ अंशांवर आला होता. मात्र, गेल्या दोन दिवसांत तापमानात परत एकदा थोडीफार वाढ होऊन सोमवारी पारा १५.७ अंशांवर स्थिरावला. गुरुवारी ढगांमुळे सकाळी सूर्यनारायणाचे दर्शन व्हायलासुद्धा उशीर झाला. सकाळी व संध्याकाळी काहीसा बोचरा वारा जाणवला. शहरात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.