क्युबामध्ये दोन वर्षांवरील मुलांचे लसीकरण

क्युबा
कोरोनारुपी राक्षसाने संपूर्ण जगाला आपल्या विळख्यात घेतले आहे. त्यामुळे अनेक व्यवहार ठप्प झाले आहेत. कोरोनाच्या भीतीपोटी शाळा महाविद्यालये बंद आहेत. यासाठी अनेक देशांनी जनजीवन पूर्ववत करण्यासाठी लसीकरण मोहीम हाती घेतली आहे. भारतात १८ वर्षांवरील सर्वांचे लसीकरण करण्याची परवानगी देण्यात आली. तर दोन वर्षांपासून पुढील लहान मुलांवर ट्रायल सुरु आहे. अजूनही दोन वर्षांवरील मुलांचे लसीकरण करायचे की नाही? असा प्रश्न समोर असताना क्युबा या देशाने दोन वर्षावरील मुलांचे लसीकरण करण्यास सुरुवात केली आहे. यापूर्वी क्युबामध्ये १२ वर्षावरील मुलांचे लसीकरण करण्यात येत होते. आता दोन वर्षांवरील मुलांना कोरोना प्रतिबंधक लस दिली जात आहे. क्युबा जगातील पहिला देश आहे, जिथे दोन वर्षांवरील मुलांचे लसीकरण सुरु आहे.
सोमवारपासून दोन वर्षांपासून पुढील सर्वांचे लसीकरण केले जात आहे. क्युबामध्ये सद्यस्थितीत दोन कोरोना लस दिल्या जात आहे. यात अब्दला आणि सोबराना लसींचा समावेश आहे. लसीचे परीक्षण केल्यानंतर क्युबा सरकारने परवानगी दिली आहे. मात्र जागतिक आरोग्य संघटनेने या लसींना अद्याप परवानगी दिलेली नाही. या लसी क्युबामध्ये तयार केलेल्या आहेत. जवळपास १.१२ कोटी लोकसंख्या असलेल्या या देशात सरकार शाळा सुरु होण्यापूर्वी मुलांचे लसीकरण करणार आहे. क्युबामध्ये अनेक ठिकाणी इंटरनेट सेवा नसल्याने मुलांना टीव्ही कार्यक्रमाच्या माध्यमातून शिकवले जात आहे. यासाठी सरकारने लसीकरण मोहीम हाती घेतली आहे. यापूर्वी मार्च २0२0 मध्ये शाळा सुरु करण्यात आल्या होत्या. मात्र कोरोना संक्रमण वेगाने होत असल्याने पुन्हा एकदा शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. अजूनही काही देश १२ वर्षांवरील अधिक वयाच्या मुलांवरील कोरोना लसीचा शोध घेत आहेत. काही देशांमध्ये परीक्षण सुरु आहे. तर चीन, संयुक्त अरब अमीरात आणि व्हेनेज्युलासारख्या देशांनी लहान मुलांना लस देण्याची घोषणा केली आहे. मात्र अजूनही लसीकरण मोहीम सुरु झालेली नाही. दुसरीकडे भारतातही १२ वर्षांवरील मुलांना लस देण्याची तयारी सुरु आहे.
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.