आज ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण

Share This News

नागपूर
राज्य शासनाच्या निर्देशानुसार ४५ वर्षांवरील वयोगटातील नागरिकांना शनिवारी, २२ मे रोजी कोव्हिशिल्ड लसीचा पहिला व दुसरा डोज दिला जाईल. राज्य शासनाने या वयोगटातील नागरिकांना दोन्ही डोज देण्यासाठी लस उपलब्ध करून दिली आहे. केंद्र शासनाच्या नवीन निर्देशानुसार आता कोव्हिशिल्डचा दुसरा डोज १२ ते १६ आठवड्यांच्या मधात नागरिकांना द्यायचे आहे. म्हणून नागरिकांनी याची नोंद घ्यावी. ज्या नागरिकांना कोव्हिशिल्डचा पहिला डोज १२ आठवड्यांपूर्वी घेतला त्यांना दुसरा डोज दिला जाईल. मनपाच्या सर्व केंद्रावर लसीकरण केल्या जाईल. आरोग्य सेवक, फ्रंटलाईन वर्कर यांनासुद्धा दुसरा डोज दिला जाणार आहे. तसेच ड्राइव इन वॅक्सिनेशन केंद्रावर ४५ वर्षांवरील नागरिकांचा लसीकरण सकाळी ९.३0 ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत होईल.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेडिकल कॉलेज), बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे सभागृह, सिद्धार्थनगर, आशीनगर झोनच्या मागे (डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय) व स्व.प्रभाकर दटके म.न.पा. महाल रोगनिदान केंद्र येथे कोव्हॅक्सिनचा फक्त दुसरा डोज उपलब्ध आहे. तसेच १८ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण राज्य शासनाचे निर्देशानुसार सध्या स्थगित करण्यात आले आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी दिली.

Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.