आमदार मुनगंटीवारांच्या पुढाकाराने व्यापाऱ्यांचे लसीकरण

Share This News

चंद्रपूरः माजी अर्थमंत्री आणि आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने आणि चंद्रपूर महानगर पालिका, फेडरेशन ऑफ ट्रेड कॉमर्स इंडस्ट्रीज आणि जलाराम सेवा मंडळाच्या वतीने जलाराम मंदिरात व्यापाऱ्यांसाठी लसीकरण केंद्र सुरु करण्यात आले.
या लसीकरण केंद्राची कल्पना आमदार मुनगंटीवार यांनीच मांडली होती. त्यानुसार चंद्रपूर महानगर पालिका व फेडरेशन ऑफ ट्रेड कॉमर्स इंडस्ट्रीज, जलाराम सेवा मंडळाच्या वतीने या केंद्राची व्यवस्था करण्यात आली. या केंद्रात ४५ वर्षांच्या वरील व्यापारी, त्यांचे कर्मचारी आणि कुटुंबीयांसाठी लसीकरणाची सोय करण्यात आली असून असंख्य व्यापारी आणि कर्मचाऱ्यांनी या केंद्राचा लाभ घेतला आहे. आमदार मुनगंटीवार यांनी केंद्राला भेट देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी केली. या केंद्रामुळे लसीकरण सोयीचे झाले असून व्यापाऱ्यांना कर्मचाऱ्याच्या वारंवार चाचण्या कराव्या लागणार नाहीत, अशी अपेक्षा फेडरेशन ऑफ ट्रेड कॉमर्स इंडस्ट्रीजच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.