आमडी-हिवरी शिवारात श्रमदानातून वनराई बंधारा

हिवरी (हिवरा) ग्राम पंचायत आमडी शिवारातील नाल्यावर महाराष्ट्र शासन कृषी विभागाचे तालुका कृषी अधिकारी डॉ. ए. टी. गच्चे यांच्या मार्गदर्शनात मंडळ कृषी अधिकारी कन्हान जी. बी. वाघ यांच्या पुढाकाराने हिवरी (हिवरा) येथील शेतकरी व नागरिकांच्या सहकार्याने श्रमदानातून गाव शिवारातील जीवंत नाल्यावर वनराई बंधारा बांधण्यात आला.
या बंधार्‍यामुळे पावसाळ्यानंतर नाल्यातून वाहुन जाणारे पाणी पारंपारिक पद्धतीने अडवून ते पाणी जमिनीत जिरविण्यासाठी मदत होईल. वनराई बंधार्‍यात साठलेल्या पाण्यामुळे आसपासच्या शिवारातील भुजल पातळी वाढून तलाव, विहिरीत जल पातळी वाढण्यास मदत होईल आणि सदर नाल्यालगत असलेल्या शेतकर्‍यांना पर्यायी सिंचनाची व्यवस्था होईल. या सार्थ हेतुने बंधार्‍याची उभारणी करण्यात आली.
यावेळी ग्रा. पं. आमडी (हिवरी)च्या सरपंच शुभांगी भोस्कर, शिवसेना पारशिवनी तालुका प्रमुख राजू भोस्कर, मंडळ कृषी अधिकारी जी. बी. वाघ, माजी सरपंच जिवलग चव्हाण, कृषी पर्यवेक्षक संपकाळ, कृषी सहायक राठोड, ढंगारे, ठोंबरे, कृषी मित्र झाडे, रोजगार सेवक सत्यशील चव्हाण व गावकरी रत्नमाला ढोके, रुख्माबाई दहाडे, मंदाबाई चव्हाण, शिल्पाबाई चव्हाण, शालू केळकर, रत्नमाला चव्हाण, यशोदा घोडमारे, रोशन नवधिंगे, प्रतिक बारई, अभिषेक वाघमारे, रजत वासे आदींसह गावातील शेतकर्‍यांच्या सहकार्याने र्शमदान करून वनराई बंधारा बांधण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.