महाराष्ट्रातील मतदारांना आता मतपत्रिकेचा पर्याय ? | Voters in Maharashtra now have the option of ballot papers?

Share This News

मुंबई –  स्थानिक स्वराज्य संस्था व विधानसभा निवडणूकीत महाराष्ट्रातील मतदारांना ईव्हीएम व्यतिरिक्त मतपत्रिकेव्दारे देखील मतदान करण्याचा पर्याय उपलब्ध होण्याची शक्यता आहे. विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी याबाबत कायदा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. जर हा कायदा राज्यात मंजूर झाला तर स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुकीत राज्यातील मतदारांना मतपत्रिकेचा पर्याय उपलब्ध होऊ शकतो. 
नागपुरातील प्रदीप उके यांनी यासंदर्भात विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांचेकडे याचिका तसेच निवेदन सादर केले होते. याबाबत विधानसभा अध्यक्षांनी मुंबईत बैठकीचे आयोजन केलं होतं.  यावेळी वैद्यकीय शिक्षणमंत्री,  अमित देशमुख, विधानपरिषद सदस्य अभिजित वंजारी, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयचे सचिव राजेंद्र भागवत, महाराष्ट्र राज्य मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंग आणि राज्याचे विधी व न्याय विभागाचे सचिव भूपेंद्र गुरव उपस्थित होते.  
भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद ३२८ अंतर्गत राज्यातील निवडणुकांविषयी कायदा तयार करण्याचा अधिकार राज्य विधिमंडळाला आहे. अनुच्छेद ३२८ नुसार राज्यातील जनतेला ईव्हीएम सोबतच मतपत्रिकेचा वापराचा पर्याय उपलब्ध करून देण्यात याव्या अशा सूचना विधानसभा अध्यक्ष नाना पाटोले यांनी केल्या. यामुळे मतदानानुसार झालेली निवडणूक आणि निकाल या सर्व प्रक्रियेवर जनतेचा विश्वास आणखी दृढ होईल आणि मतदानाची टक्केवारे देखील वाढेल अशी भूमिका पटोले यांनी बैठकीत मांडली. 
 राज्यातील मतदारांना ईव्हीएम व्यतिरिक्त मतपत्रिकेव्दारे मतदान करण्याचा विकल्प मिळणे हा त्यांचा अधिकार आहे. मतपत्रिका अथवा इव्हीएम कोणते माध्यम अधिक विश्वासार्ह आहे हे जनतेला ठरवू दया,यासाठी कायदा करावा अशी मागणी प्रदीप उके यांनी याचिकेत केली होती.    


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.