वर्धा : पहिल्या दिवशी उघडल्या ९८ शाळा

वध्र्यात शाळेच्या पहिल्या दिवशी जवळपास दोन हजार विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी शाळेच्या मुख्याध्यापकांवर जबाबदारी सोपवली आहे. मात्र कोरोना झाल्यास जबाबदारी कोण घेणार असे अनेक प्रश्न सध्या पडले आहेत.
राज्य सरकारच्या निदेर्शानुसार सोमवारी जिल्ह्यातील काही शाळांमध्ये अभ्यासला सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवशी जवळपास २ हजार विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. पहिल्या टप्प्यात ९ वी ते १२ वी वर्गाच्या अभ्यासक्रमाला सुरवात करण्यात आली आहे.
संसर्ग झाल्यास जबाबदारी कोणाची?
वध्र्याचे जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी शाळेच्या मुख्याध्यापकांवर जबाबदारी सोपवली आहे. तसेच सुरक्षेच्या दृष्टीने दिले जाणारे साहित्य शासन पुरवणार नसल्याचेही बोलून दाखवले आहे. त्यामुळे अजूनही काही पालकांना आपल्या पाल्यांना शाळेत पाठवण्यासाठी भीती आहे. कोरोना झाल्यास जबाबदारी कोण घेणार असे अनेक प्रश्न असल्याचे महाराष्ट्र राज्य शिक्षक तक्रार निवारण समितीचे अजय भोयर यांनी ईटीव्ही भारताला सांगितले आहे. वध्र्यात दोन हजार विद्यार्थ्यांची उपस्थिती आणखी काही दिवस ऑनलाईन शिक्षण देण्याचे काम सुरू आहे. पालकांचा होकार होईपयर्ंत ऑनलाईन धडे दिले जातील. विद्यार्थ्यांना शाळेत पाठवायला सुरवात झाली की प्रत्यक्ष अभ्यासक्रम सुरू होईल, अशी प्रतिक्रिया भरत ज्ञान मंदिरच्या मुख्यध्यापिका रेखा देशपांडे यांनी दिली. अजून जिल्ह्यातील 260 शाळा उघडण्याच्या प्रतीक्षेत आहेत. तर शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना आनंद झाल्याचे चित्र होते.
पहिल्या दिवशी किती विद्यार्थी झाले हजर
वध्र्यात १८ शाळांमध्ये ४0४ विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावली. तसेच आर्वी तालुक्यातील १0 शाळांना सुरुवात झाली असून १२१ विद्यार्थी हजर होते. तेच आष्टी येथे १0 शाळांमध्ये ४३५, कारंजा तालुक्यातील १३ शाळांमध्ये १४३, देवळीतील ७ शाळांमध्ये ११४ विद्यार्थी व समुद्रपूर येथे २२ शाळा सुरू झाल्या. यात २0२ विद्यार्थी उपस्थित होते. तसेच हिंगणघाट येथे १४ शाळांमध्ये २९0 विद्यार्थी तर सेलू तालुक्यात २३२ विद्यार्थ्यांनी धडे घेतले. शासकीय परिपत्रकानुसार शाळेत ९ आणि १0 व्या वर्गाच्या अभ्यासक्रमाला सुरूवात झाली आहे. या सत्रात ९ व्या वर्गात ५१ विद्यार्थी आहेत. तेच दहावीला एकूण ६५ विद्यार्थी आहेत. त्यात त्याच्या २0 विद्यार्थ्यांचे गट पाडले आहेत. यात त्यांना एक दिवसाआड बोलावून वर्गात सामाजिक अंतर ठेवून त्यांना शिकवले जाणार आहे. वध्र्यात दोन हजार विद्यार्थ्यांची उपस्थितीत्यासाठी नियमावलीतील नियमाचे पालन करणे बंधनकारक असणार आहे. शाळेत डबा आणण्याऐवजी घरून खाऊन येण्याच्या सूचना. पिण्याचे पाणीसुद्धा घरून आणावे, पर्यायी व्यवस्था आहे. मात्र खबरदारी म्हणून काळजी घेण्यात येईल. शाळा रोज सॅनिटाईज केली जाईल. हँडवाश करून वर्गात प्रवेश असणार, कोरोनाची चाचणी केल्यानंतर शाळेत शिकवण्यासाठी परवानगी असणार आहे. गट पाडून टप्या टप्याने मुलांना बोलावले जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.