वर्धा : सीसीआयकडून शेतकर्‍याची आर्थिक फसवणूक

हिंगणघाट तालुक्याच्या वतीने उपविभागीय जिल्हाधिकारी हिंगणघाट यांचे मार्फत जिल्हाधिकारी वर्धा यांना आज भारतीय जनता मोचार्चे प्रदेश सचिव अंकुश ठाकूर व तालुका अध्यक्ष विठू बेनिवार यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले.
समुद्रपूर तालुक्यातील मौजा परडा येथील शेतकरी मनोज रमेशराव चंदनखेडे यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती समुद्रपूर येथे कापूस विक्रीकरिता दिला असता सीसीआय द्वारे सदर शेतकर्‍याचा कापूस खरेदी करण्यात आला. सीसीआयने बालाजी जीनमध्ये शेतकर्‍यांचा कापूस खाली करण्यात सांगितले तिथे नियमानुसार सदर बालाजी जिनमध्ये सदर शेतकर्‍यांनी कापसाची गाडी रिकामी केली. गाडी रिकामी करतेवेळेस सीसी आय च्या स्वाधीन सदर शेतकर्‍यांनी स्वत:चे बँक पासबुकची झेरॉक्स, आधार कार्डची झेरॉक्स, सोबतच शेतीतील सात-बारा ची झेरॉक्स सर्व कागदपत्रे सीसीआय च्या स्वाधीन केली असता सदर कापसाचे वजन २३.५४ क्विंटल कापूस भरला व त्याचा भाव ५२४७.१0 ठरला असता त्याची एकूण रक्कम १,२५,५00 ( एक लाख पंचवीस हजार पाचशे ) रुपये होते. कापूस विक्री करते वेळी सदर शेतकर्‍यांनी वरील सर्व कागदपत्रे सीसीआय च्या स्वाधीन केले.
सहा महिन्यापासून सदर शेतकर्‍याला पैसे मिळाले नाही याची चौकशी सीसीआय ला केली असता सीसीआय चे अधिकारी तेलि हे उडवाउडवीचे उत्तर देत असतात सदर शेतकरी वारंवार सीसीआय कडे चौकशीकरिता जात असता किंवा बँकेमध्ये चौकशीकरिता जात असतात कोणीही सदर शेतकर्‍याला योग्य ते मार्गदर्शन करीत नाही सदर शेतकरी हा पूर्णपणे खचून गेला असून त्यावर आता उपासमारीची पाळी आलेली आहे. सदर प्रकरणा कडे श्री तेली सुद्धा जाणून बुजून दुर्लक्ष करीत आहे सदर शेतकर्‍याला न्याय मिळण्याकरिता आज भाजयुमोच्या वतीने निवेदन देण्यात आले. सदर शेतकर्‍याला पंधरा दिवसात योग्य न्याय मिळाला नाही तर भारतीय जनता युवा मोर्चा हिंगणघाट व परिसरातील सर्व शेतकरी या विरोधात जन आक्रोश आंदोलन करण्यात येईल. आशा ईशारा भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेश सचिव अंकूश ठाकूर, तालुकाध्यक्ष विठू बेनिवार यांच्या अध्यक्षते खाली देण्यात आले. निवेदन देण्यात आले वेळी विग्नेश शेंडे,लखन नागापूरे, आदित्य मोजे, निलेश फरकाडे, आकाश बावणे ,अविनाश सातरकर, शुभम माळवे, कार्यकर्ते व पदाधिकारी तसेच शेतकरी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.