वाशिम : जिल्ह्यात पिकविलेल्या स्ट्रॉबेरी सेंद्रिय शेतमाल केंद्रावर विक्रीसाठी उपलब्ध

Share This News

कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत परंपरागत कृषी विकास योजना (सेंद्रिय शेती), डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन या योजनेतील सेंद्रिय शेतकरी गटाने जिल्ह्यामध्ये सेंद्रिय, जैविक पद्धतीने पिकविलेला भाजीपाला, फळे, अन्नधान्य, कडधान्य, रानभाज्या थेट ग्राहकांपयर्ंत पोहोचविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात परिसरात सेंद्रिय शेतमाल विक्री केंद्र सुरु करण्यात आले आहे. दर सोमवारी व गुरुवरी सुरु असलेल्या या विक्री केंद्रावर आता जिल्ह्यात पिकविलेली स्ट्रॉबेरी सुद्धा विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा ह्यआत्माचे प्रकल्प संचालक शंकर तोटावार यांनी कळविले आहे. मंगरूळपीर तालुक्यातील चांदई येथील सचिन मधुकर ठाकरे यांनी त्यांच्या शेतात स्ट्रॉबेरी फळाचे उत्पादन घेतले आहे. स्ट्रॉबेरी हे फळ शक्यतो महाबळेश्‍वर सारख्या थंड हवेच्या ठिकाणी येणारे पिक आहे. परंतु श्री. ठाकरे यांनी शेतीत नवीन प्रयोग करीत स्ट्रॉबेरीची लागवड केली आहे. या प्रयोगशील शेतकर्‍याला प्रोत्साहन म्हणून शहरातील नागरिकांनी सोमवारी व गुरुवारी सकाळी १0 ते सायंकाळी ६ वा. दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील सेंद्रिय शेतमाल विक्री केंद्राला भेट देवून स्ट्रॉबेरी खरेदी करावी, असे आवाहन श्री. तोटावार यांनी केले आहे.

Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.