शहरातील चार जलकुंभांचा पाणीपुरवठा आज बाधित

नागपूर
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचआय) व ऑरेंज सिटी वॉटर (ओसीडब्ल्यू) यांनी भरतनगर चौक येथे नव्याने टाकण्यात आलेल्या ७00 मिमी व्यासाच्या वाहिनीची आंतरजोडणी जुन्या ७00 मिमी व्यासाच्या वाहिनीशी तर मानेवाडा चौक येथे नवीन ५00 मिमी व्यासाच्या वाहिनीची आंतरजोडणी जुन्या ५00 मिमी व्यासाच्या वाहिनीशी करण्याचे काम हाती घेतले आहे. सोमवारी २१ डिसेंबर रोजी हे काम करण्यात येणार असून याकरिता २४ तासाचे शटडाऊन करण्यात येणार आहे. या कामामुळे चार जलकुंभाचा पाणीपुरवठा बाधित होणार आहे.
शटडाऊन दरम्यान पाणीपुरवठा बाधित राहणार्‍या भागांमध्ये सुभाननगर जलकुंभ, नेताजीनगर, सुभाननगर, साईनगर, भरतनगर, म्हाडा कॉलनी, गुलमोहरनगर, आभा कॉलनी, शिक्षक कॉलनी, विजयनगर, गुजराती कॉलनी आदी भागांचा समावेश आहे. पारडी-१ जलकुंभ: महाजनपुरा, खाटिकपुरा, मातंगपुरा, डबलेवाडी, उडिया मोहल्ला, गजानन मंदिर परिसर, ठवकरवाडी, अंबेनगर, समतानगर, एकतानगर, दुर्गानगर, सराई मोहल्ला, हनुमान मंदिर, सद्गुरुनगर, विनोबा भावेनगर, कोष्टीपुरा, राणीसती ले-आऊट, जय दुर्गानगर, रामभूमी १, रामभूमी २, सुंदरनगर, शेंडेनगर, दीपनगर. पारडी-२ जलकुंभ: तालपुरा, शारदानगर, भवानी मंदिर, गणेश मंदिर परिसर, राम मंदिर परिसर, घटाटेनगर, अशोकनगर, रेणुकानगर, गंगाबाग, नवीननगर, श्यामनगर, आभानगर, भरतवाडा गाव, करारेनगर, पुनापूर गाव, शिवशक्तीनगर, भांडेवाडी जलकुंभ: राजनगर, बालाजी किराणा, वैष्णोदेवीनगर, र्शावणनगर, सरजू टाऊन, खांदवानी टाऊन, पवनशक्तीनगर, अंतुजीनगर, तुलसीनगर, अब्बुमियानगर, महेशनगर, मेहेरनगर, सरोदेनगर, साहिलनगर आदी परिसरांचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.