मोवाड न.प.ला पूर्णवेळ सीईओ कधी?

शहरात केंद्र शासनाची योजना राबविली जात आहे. काही लाभार्थ्यांनी घराचे काम केले असून, त्यांना दुसर्‍या टप्प्याच्या हप्त्याचा निधी मिळाला नाही.स्वच्छता रखडलेली; उद्याने बंद
शहरात स्वच्छता पूर्णत: रखडलेली आहे. शहरात लाखो रुपये खर्च करून तणनाशकाची फवारणी केली. मात्र, शहरातील गांजर गवत जस्याच तसे आहे. राज्य सरकाने शासकीय नियमावली लावून उद्याने सुरू केली. मात्र, मोवाड न. प. प्रशासनाला अजुनपर्यंत उद्याने सुरू केली नाही. उद्याने कधी सुरू होईल, याची नागरिक वाट बघत आहे.
पाच वर्षांचा कार्यकाळ संपल्याने नगर परिषद बरखास्त करण्यात आली. कोरोना संक्रमणामुळे सार्वत्रिक निवडणूक घेणे शक्य नाही. त्यातच पालिकेचे मुख्यधिकारी सिद्धार्थ मेर्शाम यांची बदली करण्यात आली. नरखेड नगरपरिषदेचे मुख्यधिकारी प्रवीण मानकर यांच्याकडे प्रभार सोपविण्यात आला. लोकप्रतिनिधी व पूर्ण वेळ मुख्यधिकारी नसल्याने स्थानिक विकास कामे प्रभावित झाली आहे. त्यामुळे पालिकेला पूर्ण वेळ मुख्यधिकारी कधी मिळणार, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.
मोवाड (ता. नरखेड) नगरपालिकेचा कार्यकाळ मे २0२0 मध्ये संपुष्टात आला. कोरोना संक्रमनामूळे पालिकेची सार्वत्रिक निवडूक पुढे ढकलण्यात आली. शहरात कोरोना सक्रमण वाढल्याचा ठपका ठेवत पालिकेचे मुख्यधिकारी सिद्धार्थ मेर्शाम यांची ७ जुलै रोजी बदली करण्यात आली. त्याचा प्रभार नरखेड नगरपलिकेचे मुख्यधिकारी प्रवीण मानकर यांच्याकडे सोपविला आहे. ते मोवाड पालिका कार्यालयात आठवड्यातील दोन दिवस येतात. लोकप्रतिनिधी आणि पूर्णवेळ मुख्यधिकारी नसल्याने स्थानिक विकासकामांना वेळेवर मंजूरी देणे, ती कामे नियोजित वेळेत पूर्ण करून घेणे, शहराच्या स्वच्छतेकडे लक्ष देणे यासह अन्य महत्त्वाची कामे रखडली आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.