मंगळावर रोवर लॅंण्डिंग यशस्वी करणाऱ्या, NASA च्या डॉ स्वाती मोहन कोण आहेत ? / Who is NASA’s Dr. Swati Mohan who made the successful rover landing on Mars?

अमेरिकेची अंतराळ एजन्सी असलेल्या नॅशनल एरोनॉटिक्स एण्ड स्पेस एडमिनिस्ट्रेशन (NASA) च्या पर्सविर्न्स रोवरने गुरूवारी मंगळ ग्रहावर यशस्वीपणे अशी लॅंण्डिंग केले. हा रोवर मंगळ ग्रहावर उतरत असतानाच जसा हवेच्या संपर्कात आला तसाच एक शक्तीशाली असा स्फोट झाला. पण या स्फोटापासूनच वाचतच या रोवरने एतिहासिक अशी यशस्वी लॅंण्डिंग केले. हे एतिहासिक मिशन यशस्वीपणे सिद्धीस नेण्यासाठी आणि याचे संपुर्णपणे संचलन करण्यामध्ये एका मूळच्या भारतीय असलेल्या अमेरिकन इंजिनियर स्वाती मोहन यांना मोठे श्रेय झाले. मिशनच्या दरम्यान रोवरवर संपुर्णपणे नियंत्रण ठेवणे आणि लॅंण्डिंग सिस्टिमला पुर्णपणे यशस्वी करण्यासाठी त्यांचे योगदान हे अतिशय महत्वाचे असे आहे.

नासाचा रोव्हर हा यशस्वीपणे मंगळ ग्रहावर उतरताच स्वातीचे पहिले उद्गार होते की, टचडाऊन कन्फर्म्फड ! मंगळ ग्रहावर हा रोवर आता सुरक्षित आहे. मंगळावर याआधीची जीवसृष्टीसाठी शोधण्यासाठी हा रोवर सज्ज असल्याचे त्यांनी आपल्या प्रतिक्रियेत म्हटले. जेव्हा संपुर्ण जग हे अमेरिकन रोवरची लॅंण्डिंग पाहत होते, तेव्हा स्वाती मोहन या कंट्रोल रूममध्ये शांतपणे बसल्या होत्या. सिस्टिम आणि प्रोजेक्ट टीमसोबत त्या संवाद साधतानाच संपुर्ण मोहीमेचे समन्वय करत होत्या.

कोण आहेत डॉ स्वाती मोहन ?

नासाच्या वैज्ञानिक असलेल्या डॉ स्वाती मोहन या मूळच्या भारतीय आहेत. जेव्हा १ वर्षे वय होते, तेव्हा त्यांच्या कुटुंबीयांसोबत त्यांना अमेरिकेला जावे लागले. डॉ स्वाती मोहन यांच्या बालपणातील बहुतांश वर्षे ही उत्तर वर्जीनिया – वॉशिंग्टन डीसी मेट्रो शहरात गेली आहेत. अवघे ९ वर्षे वय असताना त्यांनी पहिल्यांदा स्टार ट्रेक पाहिले होते. त्यामध्ये आकाशगंगेतील नव्या क्षेत्रातील चित्रीकरणाचा प्रभाव त्यांच्या मनावर होता. वयाच्या १६ व्या वर्षी त्यांनी डॉक्टर व्हायचे उदिष्ट ठेवले होते. पण आकाशगंगेच्या बाबतीत असणारे आकर्षण, नवनवीन आणि सुंदर ग्रहांचा अभ्यास करायचा हे ध्येय त्यांनी निश्चित केले. आपल्या शाळेतील फिजिक्स शिकवणाऱ्या शिक्षिकेचा त्यांच्या शिक्षणावर अतिशय मोठा प्रभाव होता. त्यांनी कॉर्नेल विद्यापिठात मेकॅनिकल आणि एयरोस्पेस इंजिनिअरींग विषयाचे पदवीचे शिक्षण पुर्ण केले. त्यानंतर मैसेच्यूसेट्स इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (MIT) येथून त्यांनी एयरोनॉटिक्स / एस्ट्रोनॉटिक्स या विषयात पदव्युत्तर शिक्षण पुर्ण केले.

NASA च्या चंद्र आणि शनि मिशनमध्येही त्यांचे योगदान

स्वाती मोहन नासाच्या पेसाडेना स्थित जेट प्रोपलन्स लॅबमध्ये सुरूवातीपासूनच पर्सविरन्स रोवर मिशनच्या सदस्या राहिलेल्या आहेत. त्यासोबतच नासाने आतापर्यंत राबवलेल्या अनेक महत्वाच्या मिशनमध्ये त्यांचे योगदान आहे. भारतीय वंशाच्या अमेरिकन असणाऱ्या स्वाती यांनी चंद्र आणि शनि ग्रहाच्या मोहीमांचा हिस्सा राहिलेल्या आहेत. मंगळ गृहावर दाखल झालेला पर्सविरन्स रोवर गुरूवारी दुपारी ३.५५ वाजता (अमेरिकन वेळेनुसार) मंगळ ग्रहाच्या जमीनीवर दाखल झाला. या मिशन अंतर्गत हा रोवर आता प्राचीन माइक्रोबियल काळातल्या जीवसृष्टीच्या संशोधनासाठी कार्यरत होणार आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.