उद्योजकांना सहकार्य करणार

मला २0२१, २0२२ एवढेच काय २0५0 मध्येही मुख्यमंत्री म्हणून बोलावले तर मी नाही कसे म्हणणार? असा प्रश्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मॅग्नेटिक महाराष्ट्र २.0 या कार्यक्रमात विचारला. त्यानंतर ते म्हणाले की विनोदाचा भाग सोडून द्या पण महाराष्ट्र सरकार उद्योजकांच्या मागे ठामपणे उभे राहील, असा विश्‍वास या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.
आमचे सरकार हे तीन पक्षांचे आहे. या सरकारमध्ये मती, गती आणि प्रगती असे तिन्ही गुण आहेत. त्यामुळे उद्योजकांनी निश्‍चिंत रहावे आम्ही त्यांच्या पाठीशी उभे आहोत, असे प्रतिपादन उद्धव ठाकरे यांनी केले. उद्योग विभागाने एक लाख कोटी रुपये गुंतवणूक करण्याचे उद्दिष्ट पूर्ण केल्याबद्दल सुभाष देसाई आणि त्यांच्या टीमचे अभिनंदन. मी त्यावेळी १ लाख कोटींचे उद्दिष्ट दिले होते. समाधान आणि अभिमान वाटेल असाच हा क्षण आहे. उद्योग मित्र ही संकल्पना छान आहे. देशाच्या प्रगतीची धारणा महत्त्वाची. काम म्हणजे काम हे जेव्हा आपल्या अंगी भिनेल तेव्हा महाराष्ट्र प्रगती करेल असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
मॅग्नेटिक महाराष्ट्र म्हणजे मॅग्नेटिक पॉवर आहेच. पण ही पॉवर कसली आहे. कशामुळे हा शब्द वापरला तर ती पॉवर तुम्ही आहात. घराघरात लक्ष्मी जाते तेव्हा घरातले लोक कसे आहेत तेच बघते. घरातले सदस्य समाधानी आहेत का? की आपसात लढत आहेत हे पाहत असते. घरात समाधानी वातावरण असेल तरच लक्ष्मी येते. तुम्ही सगळे उद्योजक म्हणजे आमच्या घरातलेच लोक आहात. जिथे घरात ताकद मिळते तिथे साहजिकच विदेशातील ताकद येणारच. घरात येणारी ताकद म्हणजे जणू हत्तीचे बळच असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. उद्योग विभागाने एक लाख कोटी रुपये गुंतवणूक करण्याचे उद्दिष्ट पूर्ण केल्याबद्दल सुभाष देसाई आणि त्यांच्या टीमचे अभिनंदन. मी त्यावेळी १ लाख कोटींचे उद्दिष्ट दिले होते. समाधान आणि अभिमान वाटेल असाच हा क्षण आहे. उद्योग मित्र ही संकल्पना छान आहे. देशाच्या प्रगतीची धारणा महत्त्वाची. काम म्हणजे काम हे जेव्हा आपल्या अंगी भिनेल तेव्हा महाराष्ट्र प्रगती करेल असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.