घरात गुप्तधन असल्याचं सांगून महिलेची एक लाखाने फसवणूक | Woman cheated by claiming to have secret money in the house

नागपूर : उपराजधानी नागपूरात फसवणुकीचा आणखी एक अजब प्रकार समोर आला आहे. डोक्याचे तेल विकणाऱ्या दोघांनी महिलेला भीती दाखवून फसवणूक केली आहे. तुमच्या मुलाला भूत बाधा झाली आहे, तुमच्या घरात गुप्त धन आहे, त्यावर शेष नागाच विष आहे ते काढून देतो या पूजे साठी 4 लाख रुपये लागतील अश्या प्रकारे भीती दाखवून महिलेची 1 लाख रूपयांनी फसवणूक करणाऱ्या भोंदू बाबा ला गिट्टीखदान पोलिसांनी अटक केली आहे. त्याचं नाव राज साहेबराज मंदी उर्फ गिरी महाराज(२५) असे आहे तर त्याचा एक साथीदार आरोपी फरार आहे.
तक्रारदार महिला ही गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दाभा परिसरात राहते. दोन दिवसांपूर्वी दोन इसम तेल विकण्याचा बहाण्याने आले होते. यावेळी त्या महिलेच्या भभाडेपणाचा गैरफायदा घेऊन आरोपींनी तिला भीती दाखवायला सुरवात केली. महिला आपल्या जाळ्यात अडकत असल्याचं दिसताच आरोपींनी महिलेला विश्वसात घेतलं. तुझ्या मुलाला भूतबाधा झाली आहे, तुझ्या घरात गुप्त धन असून त्यावर शेष नागाचे विष आहे. ते आम्ही काढून देतो त्यासाठी देवाच्या जवळ पूजा करावी लागेल, त्यासाठी चार लाख रुपये खर्च येईल असं सांगितलं. गुप्तधन मिळणार या लालसेने महिलेने देखील तिच्या जवळ असलेले एक लाख रुपये दोघांच्या स्वाधीन केले. उर्वरित रक्कम पूजा झाल्यानंतर देण्याचं ठरलं होतं. त्यानंतर ते भोंदू बाबा पूजा करण्यासाठी टाळाटाळ करत असल्याने त्या महिलेला संशय आल्यामुळे त्यांनी गिट्टीखदान पोलीस ठाण्यात जाऊन या संदर्भात तक्रार नोंदवली. पोलिसांनी देखील तक्रारीची तत्काळ दखल घेत एका आरोपीला अटक केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.