विविध मागण्यांसाठी कामगारांचा आज संप

Share This News

नागपुरातही होणार निदर्शने

देशभरातील सरकारी व निम सरकारी कर्मचार्‍यांनी आपल्या विविध मागण्यांसदर्भात देशव्यापी संप पुकारला आहे. नागपूर शहरात देखील कर्मचारी या संपात सहभागी होणार असून शहरातील विविध ठिकाणी कर्मचारी निदर्शने करतील. या माध्यमातून सरकारचे मागण्यांकडे लक्ष वेधण्यात येईल.

देशव्यापी संपाला मोठय़ा संख्येत विविध कर्मचारी संघटनांनी सर्मथन जाहीर केले आहे. नागपूर शहरातील राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, कामगार संघटना संयुक्त कृती समिती, महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ, कृतिशील नवृत्त कर्मचारी अधिकारी संस्था आदी संस्थांचा यात समावेश आहे. कर्मचार्‍यांच्या अनेक महत्त्वपूर्ण मागण्या आहेत. यात, प्रामुख्याने १९८२ ची जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी. खाजगीकरण, कंत्राटीकरण धोरण रद्द करून सध्याच्या अंशकालीन व कंत्राटी कर्मचार्‍यांच्या सेवा नियमित करण्यात याव्यात. मुदतपूर्व सेवानवृत्तीचे जाचक धोरण रद्द करण्यात यावे. कामगार, कर्मचार्‍यांना देशोधडीला लावणारे नवीन कामगार कायदे रद्द करण्यात यावे. केंद्रीय कर्मचार्‍यांना देय असणारे सर्व भत्ते राज्य कर्मचार्‍यांना मंजूर करण्यात यावे. सर्व संवर्गातील रिक्त पदे तत्काळ भरावी व ही पदे भरतानाच अनुकंपा तत्वावरील नियुक्त विनाअट करण्यात याव्यात. इतर सर्व प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी सर्व संबंधित संवर्ग संघटनेच्या प्रतिनिधींसोबत निर्णयात्मक चर्चा करण्यात यावी, आदी मागण्यांचा समावेश आहे.

Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.