यशोमती ठाकूर यांचे ते ट्विट भन्नाट व्हायरल

सोशल मीडियावर राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री एडवोकेट यशोमती ठाकूर यांचे एक ट्विट जोरदार व्हायरल होत आहे या ट्विटमध्ये त्यांनी नामोल्लेख न करता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्य शैलीवर जोरदार प्रहार केलाय.

” तो देश लुटायलाच आला आहे मात्र असे दाखवत आहे जसं की तो मसीहा आहे, हे मी कोणाबद्दल बोलत नाही तर मनी हाईस्ट या नव्या वेब सिरीज बद्दल बोलत आहे कुणाबद्दल हे वाटल्यास तो केवळ योगायोग समजावा” असे ट्विट ठाकूर यांनी केले आहे. एडवोकेट ठाकूर सातत्याने भाजपची कार्यपद्धती देशातील बेरोजगारी सातत्याने वाढणारी महागाई आणि गेल्या काही दिवसात सातत्याने वाढ होत असलेली गॅस पेट्रोल डिझेल या इंधनाची दरवाढ या विषयावर केंद्र सरकार आणि नरेंद्र मोदी यांच्यावर घणाघाती टीका करीत आहेत मात्र या वेळेस त्यांनी नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता केलेले ट्विट अत्यंत प्रभावीपणे भावना व्यक्त करणारे ठरले आहे त्यामुळे सध्या सोशल माध्यमांवर ट्रेनिंग मध्ये हे ट्विट असून त्याची जोरदार चर्चा सुरू आहे. यामुळे भाजपच्या आयटी सेल गोटात खळबळ माजली आहे.

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.