युवकाचा मांजाने कापला गळा : रक्ताच्या थारोळ्यात तरुणाचा मृत्यू

नागपूर
मकर संक्रातीच्या निमित्ताने शहरात पतंगबाजी सुरू झाली असून, नागरिकांचा मांजामुळे गळा कापणे, अपघात होणे, मृत्यू होणे अशा घटना घडत आहेत. तरीही महापालिका आणि पोलिस प्रशासन ढिम्म आहे. मंगळवारी अशाच काही समाजकंटक पतंगबाजांचा उत्साह रस्त्याने दुचाकीने जात असलेल्या २0 वर्षीय तरुणाच्या जीवावर बेतला. प्रतिबंधित नायलॉन मांजामुळे या युवकाचा गळा कापला गेला. गळा एवढा चिरला गेला की त्याचा जागीच मृत्यू झाला. सायंकाळी ५.३0 वाजताच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. मानेवाडा रोड, ज्ञानेश्‍वरनगर येथील प्रणय ठाकरे असे मृताचे नाव आहे.

नायलॉन मांजा हा प्रतिबंधित करण्यात आला आहे. त्यानंतरही हा मांजा छुप्या मार्गाने विक्री होत आहे. नायलॉन मांजा विक्री आणि वापरावर शासनाने बंदी घातली आहे. घातक मांजा विकू नका, साठवू नका आणि वापरूही नका, असे आवाहन करून पोलिसांनी कारवाईचा इशारा दिला आहे. अनेक मांजा विक्रेत्यांवर कारवाईही केली जात आहे. मात्र, ही कारवाई थातूरमातूर असून पैशांसाठी दुसर्‍याच्या जीवावर उठलेले समाजकंटक मांजाची विक्री करीत आहेत. अशांमुळेच मंगळवारी सायंकाळी एका तरुणाला जीव गमवावा लागला. प्रणय प्रकाश ठाकरे हा जाटतरोडरी नंबर १ कॉर्पोरेशन शाळेच्या पुढे दुचाकीने जात असताना त्याच्या गळय़ात अचानक मांजा अडकला. या मांजाची ओढतान सुरू असल्यामुळे त्याला गाडीवरून सावरण्याचा वेळही मिळाला नाही. त्याने जीव वाचविण्यासाठी दोन्ही हाताने मांजा पकडला. त्यात दुचाकी सुटून तो खाली पडला. गळा खोलवर कापला गेला. हातही कापले गेले. काही क्षणात तो रक्तबंबाळ झाला. घटना घडल्यानंतर स्थानिक नागरिकांनी त्याच्याकडे धाव घेतली. परंतु, प्रणय कोणतीही हालचाल करीत नव्हता. इमामवाडा पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी प्रणयला तत्काळ मेडिकल रुग्णालयात पाठविले. येथे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील यांनी त्याला तपासले. डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. कोविड तपासणीसाठी स्वॅब घेण्यात आले असून, त्याचा अहवाल अजून यायचा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.