भाजपकडून ब्रिजभूषण पाझारे यांच्यावरची निलंबनाची कारवाई रद्द

0

चंद्रपूर(Chandrapur): भाजप महाराष्ट्रकडून दिनांक 11 नोव्हेंबर 2025 रोजी अधिकृत पत्राद्वारे ब्रिजभूषण पाझारे यांच्यावर 2024 च्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीदरम्यान करण्यात आलेली निलंबनाची कारवाई मागे घेतल्याची घोषणा करण्यात आली आहे.
पक्षशिस्तभंग प्रकरणी पाझारे यांच्यावर करण्यात आलेली कारवाई राज्य अनुशासन समितीच्या खुलाशाच्या आधारे रद्द करण्यात आल्याचे पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे. याबाबतची अधिकृत माहिती महाराष्ट्र भाजपा कार्यालय सचिव मुकुंद कुलकर्णी यांनी स्वाक्षरीत पत्राद्वारे दिली.
या निर्णयामुळे जिल्हा नेतृत्वात आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत असून या पुढे कार्यकर्त्यांना नवी ऊर्जा मिळेल आणि पाझारे यांच्या मागील अनेक वर्षांपासून पक्षाच्या बांधणीसाठी केलेले कार्य पुन्हा नव्या जोमाने सुरू होईल असा विश्वास व्यक्त केल्याजात आहे. तेव्हा हे सर्व शक्य झाले
मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब, मा. महसूलमंत्री श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे,भाजपचे प्रदेश अध्यक्ष श्री. रवींद्रजी चव्हाण यांच्या सुचणे प्रमाणे कार्यालय सचिव श्री. मुकुंद कुलकर्णी यांनी निलंबन रद्द चे पत्र पाठवले.
जिल्ह्याचे जेष्ठनेते माजीमंत्री श्रीमती शोभाताई फडणवीस, माजीमंत्री आमदार डॉ. सुधीरभाऊ मुनगंटीवार आमचे मार्गदर्शक ज्येष्ठनेते हंसराजजी अहिर,ज्येष्ठनेते श्री. चंदनसीहजी चंदेल, चिमूर विधानसभा क्षेत्रातील लोकप्रिय आमदार श्री. बंटीभाऊ बागडिया,चंद्रपूर क्षेत्राचे आमदार किशोरभाऊ जोरगेवारजी, राजुरा क्षेत्राचे आमदार श्री. देवरावजी भोंगडे,
वरोरा–भद्रावती क्षेत्राचे आमदार श्री. करणजी देवतळे,माजी आमदार ॲड. संजयजी धोटे, श्री. अतुलजी देशकर जिल्हा ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष हरिशजी शर्मा, महानगराचे जिल्हाध्यक्ष सुभाषभाऊ कासनगुट्टूवार, माजी जिल्हाध्यक्ष महानगर राहुलजी पावडे,विशाल निंबाळकर,धनराज कोवे,सचिन यामावार यांनी पाझारे यांचे स्वागत केले व पुढील यशस्वी वाटचाली करीता शुभेच्छा दिल्या.
सदर पत्राची प्रत जिल्हाध्यक्ष सुभाष कासनगुट्टूवार (चंद्रपूर शहर) आणि हरीश शर्मा (चंद्रपूर ग्रामीण) यांना पाठविण्यात आली आहे.या सर्व मान्यवरांच्या विश्वासामुळे आणि आशीर्वादामुळे पक्षनिष्ठा, विकासकार्यासाठीची बांधिलकी आणि जनसेवा हीच माझी ओळख आहे.यापुढे नव्या जोमाने व अधिक शक्तीने लोकसेवा करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. असेमत ब्रिजभूषण पाझारे यांनी कळविले आहे.