
भद्रावती पोलिसांची कारवाई
भद्रावती : दिनांक २६ नोव्हेंबर रोजी भद्रावती पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार सुमनाणा चौक परिसरात एक युवक अवैधरीत्या तलवार बाळगून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करत असल्याची माहिती मिळाली. त्यावर तातडीने कारवाई करत पोलिसांनी आरोपी आशोक कोडपे (वय २२, रा. शिवाजी नगर, भद्रावती) याला ताब्यात घेतले.
तलवार किंमत सुमारे ९००/- रुपये इतकी असून आरोपीकडे सदर घातक शस्त्र कुठून आले, कोणत्या उद्देशाने तो फिरत होता याचा तपास सुरू आहे. त्याच्याविरोधात भादंवि कलम ४, २५ भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक श्री. मुन्ना सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली, अपर पोलिस अधीक्षक श्री. संतोष बालक, उपविभागीय पोलिस अधिकारी रोहन माने यांच्या देखरेखीखाली करण्यात आली. स्थानिक पथकात पोलीस निरीक्षक श्री. जनार्दन गायकवाड, PSI अनूप कपलेवार यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.




















