Home MAHARASHTRA नितीनजी गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त रंगली भव्य चित्रकला स्पर्धा!

नितीनजी गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त रंगली भव्य चित्रकला स्पर्धा!

0

नागपूर (Nagpur):- भारत सरकारचे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री तथा नागपूरचे लोकप्रिय खासदार मा. नितीनजी गडकरी (Nitin Gadkari) यांच्या वाढदिवसानिमित्त धरमपेठ येथे भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. ट्रॅफिक चिल्ड्रन पार्कमध्ये पार पडलेल्या या स्पर्धेला विद्यार्थी, पालक आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

या उपक्रमाचे आयोजन नगरसेवक सुनील हिरणवार यांच्या पुढाकाराने करण्यात आले असून श्रीमती ज्योत्सना हिरणवार यांनी संयोजक म्हणून यशस्वी नियोजन केले. स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेच्या जोरावर विविध विषयांवर सुंदर चित्रे साकारत उपस्थितांची वाहवा मिळवली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. गिरीशजी व्यास (माजी आमदार) उपस्थित होते, तर पारितोषिक वितरण मा. अनिलजी सोले (माजी आमदार) यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी अनेक मान्यवर, पदाधिकारी व नागरिकांची विशेष उपस्थिती लाभली.

🌟 विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणारा हा उपक्रम यशस्वी ठरला.
🌟 कला, संस्कार आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर संगम या स्पर्धेत पाहायला मिळाला.
🌟 नितीनजी गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी उपक्रमांची परंपरा कायम राखत हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

आयोजक :
सुनील हिरणवार
नगरसेवक, प्रभाग क्र. १५, धरमपेठ

संयोजक :
श्रीमती ज्योत्सना हिरणवार