Home Artical Blog लोककला महोत्‍सवातून घडले भारतीय संस्कृतीचे दर्शन

लोककला महोत्‍सवातून घडले भारतीय संस्कृतीचे दर्शन

0

नागपूर(Nagpur), 29 मे :
सांस्‍कृतिक मंत्रालय भारत सरकार अंतर्गत रामटेक येथील जयभीम डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्‍मारक समिती रामटेक, शाहीर टेंभुर्णे गुरुजी सार्वजनिक वाचनालय, द लॉर्ड अशोका बॅकवर्ड मल्‍टीपर्पज सोसायटी व विश्रांती सूर कला प्रतिष्‍ठानच्‍या संयुक्‍त वतीने विठ्ठल-रुक्मिणी सभागृह, गुमगाव येथे आयोजित लोककला महोत्सवातून भारतीय संस्‍कृतीचे दर्शन घडले.
आकाशवाणी व दूरदर्शन मान्यताप्राप्त कलाकार मनोहर चिंचोलकर यांच्‍या हस्‍ते महोत्‍सवाचे उद्घाटन झाले. प्रसिद्ध लोककलावंत अशोक खेकारे कार्यकमाच्‍या अध्यक्षस्‍थानी होते.


जय भीम डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीतर्फे गुरू-शिष्य योजनेअंतर्गत गुरुवंदन सोहळा, ‘शृंगार लोककलेचा’, पारंपरिक गोंधळ, ‘महामानवास वंदना’ तसेच लुप्तप्राय होत असलेल्या ओव्या, वासुदेव, पांगुळ, किंगरी आदी लोककलांचे सादरीकरण करण्यात आले. शाहीर टेंभुर्णे गुरुजी सार्वजनिक वाचनालयातर्फे पारंपरिक पौराणिक पोवाडे व भारूड सादर करण्यात आले. द लॉर्ड अशोका बॅकवर्ड मल्टीपर्पज सोसायटीतर्फे ‘थाप डफावर’ आणि ‘डहाका’ यांचे सादरीकरण झाले. तर विश्रांती सूर कला प्रतिष्ठानतर्फे टाळ-मृदंगांचा गजर आणि ‘जागर संत नामाचा’ या कार्यक्रमांनी रसिकांची मने जिंकली.
कार्यक्रमाला परिसरातील नागरिक, कला रसिक आणि लोककलाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व सहभागी कलाकारांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. आयोजकांच्या वतीने उपस्थित मान्यवर, कलाकार आणि रसिकांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.