केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढला

0

नवी दिल्ली (NEW DELHI): केंद्र सरकारने दिवाळीपूर्वी सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मोठा दिलासा दिला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. (Dearness Allowance Hike) महागाई भत्ता 4 टक्के वाढून 42 टक्क्यांवरून 46 टक्के करण्यात आला आहे. १ जुलै २०२३ पासून त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

सरकारकडून वर्षांतून दोनदा महागाई भत्त्याचा आढावा घेतला जातो. त्याचा लाभ १ जानेवारी व १ जुलैपासून दिला जातो. देशात सुमारे ५२ लाख कर्मचारी केंद्र सरकारच्या अंतर्गत काम करतात आणि ६० लाख पेन्शनधारक आहेत, ज्यांना सरकारच्या या मोठ्या निर्णयाचा फायदा होणार आहे.

महागाई भत्त्यातील बदलाचा थेट परिणाम केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारावर दिसून येतो. त्यात वाढ झाल्याने कर्मचाऱ्यांच्या हातातील पगारही वाढतो. सरकार महागाई दराची आकडेवारी लक्षात घेऊन निर्णय घेते. महागाई जितकी जास्त असेल तितकी कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये वाढ अपेक्षित आहे.