डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेकनिकल युनिव्हर्सिटी (DBATU) विद्यापीठत अंतर्गत अभियांत्रिकी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान थांबवा अन्यथा विद्यार्थी पालकांना घेऊन आंदोलन करणार – युवासेना पूर्व विदर्भ सचिव, सिनेट सदस्य इंजि. निलेश बेलखेडे यांचा इशारा.

0

युवासेना पूर्व विदर्भ सचिव, सिनेट सदस्य इंजि. निलेश बेलखेडे यांचा इशारा

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक महाविद्यालय अभियांत्रिकी, फॉर्मसी, अश्या विविध अभ्यासक्रमासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेकनिकल युनिव्हर्सिटी (DBATU) विद्यापीठात समाविष्ट झालेले आहेत. चांगल दर्जेदार शिक्षण मिळणार असं विविध संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांना सांगितले जातात त्यामुळे जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी- पालक विशेषतः अभियांत्रिकी, फार्मसी या विषयासाठी DBATU या विदयापीठामध्ये प्रवेश घेत आहेत. परंतु अभियांत्रिकी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यापीठामुळे नाहक त्रासाला समोर जावे लागतं आहे. अभियांत्रिकी महाविद्यालय मध्ये शिकणारे विद्यार्थ्यांना सर्व परीक्षा उत्तीर्ण होऊनसुद्धा त्यान्च्या मार्कशीट आतापर्यन्त मिळत नसल्यामुळे अभियांत्रिकी नंतर पुढील शिक्षण घेण्यासाठी आणि इंजिनिअर बनून विशेषतः नौकरी साठी इच्छुक विविध शासकीय, खासगी कंपनी साठी अर्ज करण्याकरिता गुणपत्रिका (मार्कशीट्स),डिग्री नसल्याने विद्यार्थ्यांना मुकावे लागतं आहे. काही विद्यार्थी तर नौकरीसाठीच्या परीक्षा पास होऊन सुद्धा शैक्षणिक कागदपत्रे पळताळणी मध्ये मार्कशीट्स नसल्या कारणाने हातामध्ये आलेली नौकरीची संधी त्याना गमवावी लागत असून या भोंगळ कारभारामुळे विद्यार्थी- पालकांमध्ये रोष निर्माण होत आहे. विद्यार्थी- पालकांनी महाविद्यालय DBATU विदयापीठ च्या वतीने दिरंगाई होत असून वारंवार विचारणा करून सुद्धा त्यांच्याकळून समाधान कारक उत्तरे मिळत नसल्याचे कारणं मिळत आहेत. काही महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना तर चक्क उन्हाळी 2023- 2024 च्या परीक्षा उत्तीर्ण झालेल्या अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना सुद्धा त्यांच्या तिसऱ्या सत्रा पासूनचे गुणपत्रिका अद्यापही मिळालेले नाही अशी माहिती मिळत आहे. अनेक विद्यार्थ्यानी व पालकांनी या विषयाला घेऊन विद्यार्थ्यांना सहकार्य करण्याकरिता शिवसेना( उ बा ठा) – युवासेना पूर्व सचिव तसेच सिनेट सदस्य इंजि. निलेश बेलखेडे यांच्याकडे धाव घेतली असता सदर विषयावर त्यांनी DBATU च्या सीओई डॉ.जाधव आणि इतर अधिकारी यांना ई-मेल पाठवून आणि कॉल करून सदर विषयावर चर्चा केली.येत्या काही दिवसात यावर तोडगा काढून विद्यार्थ्यांना गुणपत्रिका, डिग्री मिळायला हव्या अन्यथा मोठं आंदोलन करू असा इशारा दिला.