वीज चोर ग्राहकाला न्यायालयाकडून ‘कोर्ट उठेपर्यंत’ तुरुंगवास आणि ₹10,000 दंड

0

नागपूर, दि. 22 नोव्हेंबर 20025: वीज चोरी करणाऱ्या ग्राहकाला नागपूरच्या विशेष न्यायालयाने जोरदार दणका दिला आहे. जिल्हा न्यायाधीश-3 आणि अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्री एस. एच. ग्वालानी यांनी विशेष प्रकरण क्र. 53/2022 मध्ये ग्राहक शमशेरा बेगम शेख बब्बू यांना दोषी ठरवून ‘न्यायालयीन कामकाजाच्या समाप्तीपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा आणि ₹10,000 (दहा हजार रुपये) दंड ठोठावला आहे.

ग्राहक शमशेरा बेगम शेख बब्बू यांचे वीज बिल थकीत असल्यामुळे महावितरणने त्यांची वीज जोडणी नियमानुसार खंडित केली होती.

मात्र, वीज बिल न भरता आणि कोणतीही पूर्वपरवानगी न घेता, आरोपी ग्राहकाने हे खंडित केलेली वीज जोडणी पुन्हा अवैधपणे जोडून वीज वापरण्यास सुरुवात केली. ही बाब महावितरणच्या निदर्शनास येताच, कंपनीने तात्काळ कारवाई करत 2021 साली मध्ये नंदनवन पोलीस स्टेशनमध्ये संबंधित ग्राहकाविरुद्ध तक्रार दाखल केली होती.

या प्रकरणाची सुनावणी करताना, जिल्हा न्यायाधीश-3 आणि अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्री एस. एच. ग्वालानी यांच्या न्यायालयाने शमशेरा बेगम शेख बब्बू यांना दोषी ठरवले. कोर्ट उठेपर्यंत तुरुंगवास तसेच ₹10,000 चा दंडाची शिक्षा सुनावली आहे.