
सत्ते विरुद्ध प्रतिसरकार चे जनक क्रांतीसिंह नाना पाटील _ किसान सभेच्या जिल्हासचिव द्वारका इमडवार
वर्धा : क्रांतिसिंह नाना पाटील हे सत्ते विरुद्ध प्रति सरकार चे जनक असून संयुक्त महाराष्ट्र लढ्याचे संघर्षशील नेते होते. त्यांनीं शेतकरी कर्जमुक्ती आंदोलनाचा लढा उभा केला. ते भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे खासदार 1957 सातारा लोकसभा आणि 1967 बीड लोकसभा आणि अखिल भारतीय किसान सभेचे 1955 साली निवडलेले अध्यक्ष आणि नाना पाटील हे भारतीय स्वातंत्र्य सैनिक आणि स्वातंत्र्या नंतर मराठी राजकारणी होते. असे प्रतिपादन महाराष्ट्र किसान सभेच्या जिल्हासचिव द्वारका इमडवार यांनी केले.
त्या क्रांती सिंह नाना पाटील यांच्या जयंती कार्यक्रमात बोलत होत्या.
या कार्यक्रमाला किसान अधिकारी अभियानाच्या नूतन मालवी , किसान महिला अधिकार च्या नूतन माळवी, महाराष्ट्र किसान सभेच्या जिल्हा सेक्रेटरी द्वारका इमडवार ,आयटक च्या जिल्हा सचिव वंदनाताई कोळनकर, सुषमा ढोक,शालेय पोषण आहार चे कॉम. विनायक ननोरेजी , रामभाऊ दाभेकरजी , राजू तेलतुमडे, जयंती ला उपस्थित होते.
पुढे बोलताना इमडवार म्हणाल्या की क्रांतीसिंह म्हणजे क्रांतिकारक नाना पाटील यांचे पूर्ण नाव नाना रामचंद्र पिसाळ होते. यांचा जन्म 3 ऑगस्ट 1900 रोजी सांगली जिल्ह्यातील येडेमच्छिंद्र येथे झाला. 1930 च्या सविनय कायदेभंग चळवळी पासून ते स्वातंत्र्यापर्यंत चळवळीत होते. जेव्हा आमचं पिक पिकलं , तव्हा तुम्ही आम्हासनी लुटलं,म्हणून आता आमचं कर्ज फिटलं अशी शेतकरी कर्जमुक्तीची क्रांतिकारी घोषणा देत देशातील पहिली शेतकरी कर्जमाफी मिळवून देणारे शेतकरी नेते क्रांतिसिंह कॉम्रेड नाना पाटील अशी त्यांची ओळख होती. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील जिल्हा स्वातंत्र्य सेनानी यांनी इंग्रज आणि त्यांच्या बगलबच्च्यांच्या पायात पत्र्या ठोकून प्रति सरकार पत्री सरकारची स्थापना करणारे यौद्धे ,हैदराबाद मुक्ती तथा संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील अग्रणी ,बीड लोकसभा मतदारसंघाचे कम्युनिस्ट पक्षाचे संसद भवनात मराठीत शपथ घेतली होती. असे त्या म्हणाल्या
या कार्यक्रमाला शेतकरी पदाधिकारीं उपस्थित होते.















