बिहारमधील ऐतिहासिक विजय हे जनतेच्या विश्वासाचे प्रतीक!

0

बिहारमधील जनतेने पुन्हा एकदा विकास, सुशासन आणि स्थिरतेवर शिक्कामोर्तब केले आहे. एनडीएला मिळालेले स्पष्ट बहुमत हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावरील प्रचंड विश्वासाचे द्योतक आहे. भारतीय जनता पार्टी सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आली आहे, ही प्रत्येक कार्यकर्त्याच्या कठोर परिश्रमांची आणि जनतेशी असलेल्या आत्मीय नात्याची कमाई आहे.

बिहारमधील हा विजय हे राष्ट्राच्या प्रगतीचे, गरीब कल्याणाचे आणि विकासाधिष्ठित राजकारणाचे आणखी एक भक्कम पाऊल आहे. या ऐतिहासिक विजयासाठी बिहारमधील जनतेचे मनःपूर्वक आभार!

— आमदार संदीप जोशी