
पुराणात वृक्ष तोड मान्य आहे का?
आधी विकासाच्या नंतर धर्माच्या नावाखाली निसर्गाची नासधूस करायची…. साधूसंतांनी ऋषींनी पुराणात लिहिलंय कोणतं वृक्ष तोडल्यान काय पाप लागतं. निसर्गाला देव मानून वृक्षाना पूजण्याची परंपरा आहे. 100 वर्षां आधीपासूनची झाडं सरकार तोडतेय. आणि ज्या परंपरेसाठी तोडतेय मग त्या पुराणात वृक्ष तोड मान्य आहे का? स्वामी समर्थ तुकोबा गौतम बुद्ध,नृसिंह सरस्वती, नवनाथ ह्यांनी वड पिंपळ औदुंबर सारख्या वृक्षा खाली बसून साधना तपस्या करीत लोक कल्याण केलंय. राजकारण आणि त्या राजकारणाचे उदातिकारण करताहेत…. साधू संत हे निसर्गाच्या सानिध्यात तपस्वी झालेत….. तो निसर्ग 18000 झाडं लावून 1 वर्षात तयार करता येईल का? Show off आणि adevertisement mindset badalnyasathi चालेले प्रयत्न सरकारला पण off करू शकते. निसर्ग आणि प्राकृति आधीच घातक परिणाम देतंय. ज्या व्यवस्था खराब झालाय त्या नीट करीत नाही….. साधू संत वैरागी आहेत ते कधीच अशी मागणी करणार नाही…. प्रभू रामानी देखील नाशिक मध्ये वास केला तेव्हा निसर्गाची काळजी घेऊनच वास्तव्य केले असेल. गोदावरी नदी हा देखील निसर्गाचाच भाग आहे ज्यासाठी कुंभ मेळा भरतोय. मग लोकांच्या राहण्यासाठी तिला नाशिक बाहेर नेणार का? नदीला आई मानलं असेल तर तिच्या काठावर विकसित झालेला निसर्ग तिचे अपत्य नाही का ? माणसाला प्रकृती चांगलाच धडा शिकवेल… आपल्या गरजा आणि सुख ह्याच्या अमर्याद भावनांमुळे होणारी निसर्गाची हानी कधीच भरून निघणार नाही आणि निसर्ग ही क्षमा करणार नाही….. 4 वर्ष पाऊस पडला नाही, ताप मान 50 डिग्री ओलांडल्यावर झाडं जळून भस्म झाल्यावर माणसाला नक्की कळेल….. सत्तेचा अहंकार आणि शक्तीचा निरंकुश वापर मानवीय संतुलन संपवेल आणि परत महाभारत नक्की घडेल…….अमित विभुते
















