मद्य घोटाळ्यात केजरीवालांचीही चौकशी होणार

0

(New Delhi)नवी दिल्ली : मद्य घोटाळ्यात आता ईडीने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना समन्स बजावले आहे. (ED Summoned CM Arvind Kejriwal) २ नोव्हेंबर रोजी त्यांना चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. विशेष म्हणजे या घोटाळ्यात काल सर्वोच्च न्यायालयाने मनीष सिसोदिया याचा जामीन अर्ज फेटाळून लावल्याने आम आदमी पार्टीला मोठा धक्का बसला आहे. (Manish Sisodia) ईडीनं दिल्लीच्या मद्य धोरणातील घोटाळ्याशी संबंधित प्रकरणात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना नोटीस पाठवून चौकशीसाठी बोलावले आहे. यापूर्वी सीबीआयनं एप्रिल महिन्यात अरविंद केजरीवालांना चौकशीसाठी बोलावले होते.

आम आदमी पार्टीच्या अधिकृत ट्विटर हँडवरुन अरविंद केजरीवालांना आलेल्या ईडीच्या समन्सबाबात प्रतिक्रिया देण्यात आली आहे. ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, आम आदमी पक्षाचा संपवणे हेच केंद्र सरकारचे ध्येय आहे. केंद्र सरकारला खोटा गुन्हा तयार करुन अरविंद केजरीवाल यांना जेलमध्ये बंद करायचे आहे.