लोकसभा निवडणूक १६ एप्रिलला..?

0

आयोग म्हणतेय ही तारीख संदर्भासाठी

नवी दिल्ली  NEW DELHI : देशात लोकसभा निवडणूक एप्रिल मे महिन्यात पार पाडली जाणार आहे. मात्र, निवडणूक आयोगाच्या एक पत्र सोशल मिडियावर व्हायरल झाले असून निवडणुकीसाठी १६ एप्रिल ही तारीख दिली जात आहे. मात्र, निवडणूक आयोगाने या पत्रावर स्पष्टीकरण दिले आहे. निवडणूक आयोगाने दावा फेटाळून लावताना निवडणूक आयोगाच्या तयारीसाठी ही तात्पुरती तारीख असल्याचे आहे. Lok Sabha

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निवडणुकीची सुरुवातीची तारीख आणि अंतिम तारीख यांचा आराखडा ठरवण्यासाठी १६ एप्रिल ही तारीख ठरवण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. निवडणूक १६ एप्रिलला होणार याच्या चर्चा सुरु झाल्यानंतर निवडणूक आयोगाच्या सीईओनी ही पोस्ट केली आहे. पत्रात देण्यात आलेली तारीख संदर्भासाठी आहे. बाकी काहीही नाही, असे आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.