आयर्न लेडी इंदिरा गांधी यांना महावितरणचे अभिवादन

0

नागपूर, दि. 19 नोव्हेंबर, 2025: – भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान, आयर्न लेडी ऑफ़ इंडीया इंदिरा गांधी यांची जयंती व राष्ट्रीय एकात्मता दिनानिमित्त महावितरणतर्फे त्यांना अभिवादन करण्यात येऊन राष्ट्रीय एकत्मता दिनाची सामूहिक शपथ घेण्यात आली.

महावितरणच्या काटोल मार्गावरील ‘विद्युत भवन’ कार्यालयात नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके इंदीरा गांधी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले. तद्नंतर राष्ट्रीय एकात्मता दिनाची सामूहिक शपथ घेण्यात आली. यावेळी अधीक्षक अभियंता संजय वाकडे, मुख्य महाव्यवस्थापक (वित्त व लेखा) अतुल राऊत, सहायक महाव्यवस्थापक (मानव संसाधन) महेश जाधव, व्यवस्थापक (वित्त व लेखा) सुधीर टेकाम, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी सचिन लहाने, कार्यकारी अभियंता समीर शेंद्रे, प्रणाली विश्लेषक प्रवीण काटोले यांच्यासह महावितरणचे अनेक अधिकारी आणि कर्मचा-यांनी इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला अभिवादन केले.


भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदीरा गांधी जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकात्मतेची सामुहीक शपथ घेतांना महावितरण अधिकारी व कर्मचारी.