घुग्गुस येथे आमदार देवराव भोंगळे यांच्या वाढदिवसानिमित्त महारक्तदान शिबिरास उस्फुर्त प्रतिसाद

0

घुग्गुस येथे १ हजार २४६ रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने केले रक्तदान

घुग्गुस : राजुरा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार,तथा घुग्गुस येथील सुपुत्र मा.श्री. देवराव भोंगळे यांच्या वाढदिवसानिमित्त २१ वर्षापासून सामाजिक बांधिलकी जोपासत घुग्गुस येथे आयोजित करण्यात आलेल्या महारक्तदान शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. तब्बल १ हजार २४६ रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान करून समाजाप्रती आपली जबाबदारी आणि मानवतेचा संदेश दिला. या महारक्तदान शिबिराचे उद्घाटन आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते पार पडले .

आमदार देवराव भोंगळे यांच्या वाढदिवसानिमित्त २१ नोव्हेंबर रोजी घुग्गुस येथील गांधी चौकात महारक्तदान शिबिराचे आयोजन देवरावदादा भोंगळे मित्र परिवार, घुग्घुसतर्फे करण्यात आले.

“रक्तदान जीवनदान” हेच ब्रीदवाक्य घेऊन मागील २१ वर्षापासून घुग्गुस शहरात महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
यावेळी कार्यकर्त्यांनी आमदार देवराव भोंगळे यांच्या वाढदिवसानिमित्त मोठया संख्येने रक्तदान करण्याचा संकल्प केला. २१ नोव्हेंबर २०२५ रोजी २६ ठिकाणी विविध शहरात व गावात महारक्तदान शिबिर घेण्यात आले. यात घुग्गुस येथे एकूण १ हजार २४६ रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने विक्रमी रक्तदान केले. यावेळी भाजपा पदाधिकारी,कार्यकर्ते व नागरिकांनी सहकार्यातून घुग्गुस येथे रक्तदात्यांची विक्रमी नोंद झाली. रक्त संकलनासाठी डॉक्टर, नर्सिंग स्टाफ यांनी तत्परतेने आपली सेवा बजावली.

यावेळी आमदार देवराव भोंगळे यांनी रक्तदात्यांचे आभार मानत वाढदिवसानिमित्त केक कापून कार्यकर्त्यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या.

यावेळी भाजपाचे जिल्हा महामंत्री विवेक बोढे,माजी पं.स.उपसभापती निरीक्षण तांड्रा, विनोद चौधरी, अमोल थेरे, चिन्नाजी नलभोगा, वसंत भोंगळे, सुरेंद्र जोगी, प्रयास सखी मंचच्या मार्गदर्शिका अर्चना भोंगळे, नितु चौधरी, किरण बोढे, बबलू सातपुते, श्रीनिवास इसारप, धनराज पारखी, गुड्डू तिवारी, असगर खान, उमेश दडमल, रवी चुने, सुनील बाम, मानस सिंग, सुरेंद्र भोंगळे, शरद गेडाम, अनुप जोगी, शंकर सिद्दम, सिनू कोत्तूर, सुरेंद्र झाडे, सुशील डांगे, राकेश भेदोडकर, योगेश बोबडे, सचिन बुच्चे, तुलसीदास ढवस, सुनील राम, योगेश घोडके, स्वप्नील इंगोले, स्वामी जनगम, विनोद जंजर्ला, गजानन जोगी, हेमंत कुमार, सचिन नांदे, शुभ सोदारी, सागर तांड्रा, कोमल ठाकरे, पांडुरंग थेरे, आशिष वाढई यांचेसह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.