पाचव्या टप्प्यात 397 उमेदवारांचे 512 अर्ज दाखल

0

मुंबई , 4 मे, (mumbai aplication news ) : राज्यातील लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या पाचव्या टप्प्यातील मतदान २० मे २०२४ रोजी होणार आहे. यासाठी राज्यातील १३ लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. शेवटच्या दिवसापर्यंत एकूण 397 उमेदवारांचे 512 अर्ज दाखल झाले असल्याची माहिती, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली आहे.

पाचव्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आजच्या शेवटच्या दिवसापर्यंत धुळे लोकसभा मतदारसंघात – 30 उमेदवारांचे 42 अर्ज, दिंडोरी – 20 उमेदवारांचे 29 अर्ज, नाशिक – 39 उमेदवारांचे 56 अर्ज, पालघर – 17 उमेदवारांचे 26 अर्ज, भिवंडी – 41 उमेदवारांचे 48 अर्ज, कल्याण – 34 उमेदवारांचे 45 अर्ज, ठाणे – 36 उमेदवारांचे 43 अर्ज, मुंबई उत्तर – 25 उमेदवारांचे 32 अर्ज, मुंबई उत्तर पश्चिम – 29 उमेदवारांचे 33 अर्ज, मुंबई उत्तर – पूर्व – 34 उमेदवारांचे 42 अर्ज, मुंबई उत्तर – मध्य – 39 उमेदवारांचे 45 अर्ज, मुंबई दक्षिण – मध्य – 32 उमेदवारांचे 41 अर्ज, मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघात 21 उमेदवारांचे 30 अर्ज दाखल झाले आहेत.

 

पाचव्या टप्प्यात 397 उमेदवारांचे 512 अर्ज दाखल

२० मे रोजी मतदान होणार
राज्यातील लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या पाचव्या टप्प्यातील मतदान २० मे २०२४ रोजी होणार आहे. यासाठी राज्यातील १३ लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. शेवटच्या दिवसापर्यंत एकूण 397 उमेदवारांचे 512 अर्ज दाखल झाले असल्याची माहिती, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली आहे. पाचव्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आजच्या शेवटच्या दिवसापर्यंत धुळे लोकसभा मतदारसंघात – 30 उमेदवारांचे 42 अर्ज, दिंडोरी – 20 उमेदवारांचे 29 अर्ज, नाशिक – 39 उमेदवारांचे 56 अर्ज, पालघर – 17 उमेदवारांचे 26 अर्ज, भिवंडी – 41 उमेदवारांचे 48 अर्ज, कल्याण – 34 उमेदवारांचे 45 अर्ज, ठाणे – 36 उमेदवारांचे 43 अर्ज, मुंबई उत्तर – 25 उमेदवारांचे 32 अर्ज, मुंबई उत्तर पश्चिम – 29 उमेदवारांचे 33 अर्ज, मुंबई उत्तर – पूर्व – 34 उमेदवारांचे 42 अर्ज, मुंबई उत्तर – मध्य – 39 उमेदवारांचे 45 अर्ज, मुंबई दक्षिण – मध्य – 32 उमेदवारांचे 41 अर्ज, मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघात 21 उमेदवारांचे 30 अर्ज दाखल झाले आहेत.
—————-
उद्धव ठाकरेंची काय औकात

नारायण राणे यांचा पलटवार

उद्धव ठाकरेंची काय औकात आहे, मी मनात नुसते आणले ना तरी बरेच काही करु शकतो, रुग्ण आहात तसेच रहावे, माझ्या रस्त्यात येऊ नये. पोलिस सरंक्षण घेऊन धमक्या देऊ नये असे नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंना इशारा दिला आहे. मी केवळ मनात आणले तरी बरेच काही करू शकतो, माझ्या रस्त्यात येऊ नको, असा इशारा दिलाय.

—————-
सोलापुरात पाईपांना भीषण आग

सरकारी मालमत्तेचे लाखोंचे नुकसान

सोलापूर शहराला स्मार्ट बनविण्यासाठी सुरू असलेल्या विकासकामांसाठीच्या पाईपांना आग लागल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत सरकारी मालमत्तेचे लाखोंचे नुकसान झाल्याची माहिती आहे. सोलापूर शहरातील बार्शी रोडवर ठेवण्यात आलेल्या प्लास्टिक पाईपांना आज, शनिवारी दुपारच्या सुमारास भीषण आग लागल्याने खळबळ उडाली होती. स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत विविध कामांसाठी लागणारे हे पाईप एकाच ठिकाणी ठेवण्यात आले होते. या पाईपांना भीषण आग लागल्यानंतर धूराचे लोट संपूर्ण शहरात पसरल्याचं दिसून आलं. त्यामुळे, नेमकं कुठं आणि कशाला आग लागली, याची चर्चा सोलापूर शहरात सुरू झाली होती.
आगीच्या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या असून त्यांच्याकडून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न केले जात आहेत. विशेष म्हणजे स्मार्ट सिटी योजनेंतर्गत ठेवण्यात आलेल्या पाईपांना यापूर्वी होम मैदान परिसरात देखील आग लागली होती. मात्र, काही दिवसांपूर्वी हे पाईप बार्शी रोडवरील भोगाव परिसरात ठेवण्यात आले. पण, तिथेही आज पुन्हा या पाईपांना आग लागल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. दरम्यान, या आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असून आग विझवण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू होते.
———-
बुलढाण्यात एसटी आणि खाजगी बसचा अपघात
एक महिला ठार, 25 प्रवासी जखमी

बुलढाणा जिल्ह्यात चिखली-मेहकर मार्गावर एसटी बस आणि एका खाजगी बसचा भीषण अपघात झाला आहे. यामध्ये एका महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 25 प्रवासी जखमी झाले आहेत. या बसमध्ये एकूण 44 प्रवासी होते अशी माहिती आहे. जखमींपैकी ७ जणांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ओवरटेक करताना ही धडक बसली असून, वाहनांचे मोठे नुकसान झाले.

——–
समुद्रात जास्त उंचीच्या लाटा उसळणार

येत्या ३६ तासांच्या कालावधीत शक्यता

भारतीय हवामानशास्र विभाग (IMD) आणि इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशियन इनफॉर्मेशन सर्व्हीस (INCOIS) यांच्याद्वारे प्राप्त माहितीनुसार, आज शनिवार दिनांक ४ मे २०२४ रोजी सकाळी ११.३० वाजेपासून ते रविवार दिनांक ५ मे २०२४ रोजी रात्री ११.३० वाजेपर्यंत ३६ तासांच्या कालावधीत समुद्रात भरतीच्या वेळी अधिक उंच लाटा उसळण्याची (swell surge waves) शक्यता वर्तवली आहे. हा इशारा लक्षात घेता, समुद्र किनारपट्टी परिसरात तसेच सखल भागांमध्ये या उसळणाऱ्या लाटांचा परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
—————-
सावली आपली साथ सोडणार
31 मेपर्यंत ‘झीरो शॅडो-डे’ ला सावली येईल पायाखाली

पाकिस्तानच्या सिंध प्रांतातून शुष्क व उष्ण वारे राजस्थानात येतात. तिकडून ते आपल्याकडे येतात. अंग भाजून काढणारे ऊन सध्या आहे. रणरणते उन आणि रखरखते वातावरण यात स्वत:च्या आणि झाडाच्या सावलीचीच काय ती सोबत. निदान ती तरी सोडून जात नाही. पण येत्या 31 मे पर्यत राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणी सावली सोबत सोडणार आहे. मे महिन्यात सूर्य डोक्यावर आल्याने तापदायक ठरत आहे.
—————-

रमा राघवमध्ये दिसणार अद्वैत दादरकर

सोमवारी 6 मे रोजी होणारा प्रवेश विशेष लक्षणीय

कलर्स मराठीवरील ‘रमा राघव’ मालिका सध्या उत्कंठावर्धक टप्प्यावर असून मालिकेत येणारे एक नवे वळण प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. रमा राघवच्या पत्रिकेत असलेला विरह टळावा यासाठी पुरोहितांनी मनावर दगड ठेऊन रमा राघवला वनवासाला पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र हा वनवास रमा राघवच्या आयुष्यात नवे वादळ आणणारा ठरणार असून विक्रम या पात्राचा त्यांच्या आयुष्यात प्रवेश होत आहे. अद्वैत दादरकर याने ही भूमिका साकारली असून भेदक डोळे, करारी नजर आणि दमदार लुक यामुळे त्याचा मालिकेतला येत्या सोमवारी 6 मे रोजी होणारा प्रवेश विशेष लक्षणीय ठरणार आहे.रमा राघवच्या नात्यांच्या अग्निपरीक्षेचा प्रवास नव्या वेळेत सोमवार ते शुक्रवार रात्री 9:30 वाजता कलर्स मराठीवर उलगडत आहे.

सामान संबंधित प्रवाशांना सुपूर्द 

एप्रिल महिन्यात,मध्य रेल्वेच्या आरपीएफ नागपूर विभागामध्ये प्रवाशांचे सामान गहाळ झाल्याची 26 प्रकरणे नोंदवली गेली. या प्रकरणांची तातडीने दखल घेण्यात आली आणि 7 लाख 21 हजार 910 रुपये किमतीचे सामान संबंधित प्रवाशांना सुपूर्द करण्यात आले.

रेल्वे प्रोटेक्शन फोर्स (RPF) प्रवासी आणि त्यांच्या सामानाची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी वचनबद्ध आहे. सामानाची कोणतीही हानी किंवा चोरी झाल्यास, प्रवाशांना ताबडतोब अधिकाऱ्यांना कळवण्यास प्रोत्साहित केले जाते. आरपीएफ हरवलेल्या वस्तू ओळखण्यासाठी आणि परत मिळवण्यासाठी आणि त्यांच्या हक्काच्या मालकांना परत करण्यासाठी सर्व आवश्यक पावले उचलेल.

प्रवाशांना त्यांच्या सामानाच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याचा सल्ला दिला जातो, जसे की मौल्यवान वस्तू नेहमी सोबत ठेवणे, बॅग सुरक्षितपणे लॉक करणे आणि सामान दुर्लक्षित सोडणे टाळणे. या सोप्या पायऱ्या रेल्वे प्रवासादरम्यान सामानाचे नुकसान किंवा चोरी रोखण्यासाठी खूप मदत करू शकतात.

मध्य रेल्वेचा आरपीएफ नागपूर विभाग सर्व प्रवाशांना सुरक्षित प्रवास देण्यासाठी कटिबद्ध आहे. आम्ही प्रवाशांना विनंती करतो की त्यांनी या प्रयत्नात आम्हाला सहकार्य करावे आणि त्यांच्या प्रवासादरम्यान आढळणाऱ्या कोणत्याही संशयास्पद हालचाली किंवा घटनांची तक्रार करा असे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले .